महापुरुषांची बदनामी प्रकरणी ठाणे उपजिल्हाधिकाऱ्यांना संभाजी ब्रिगेडचे निवेदन.

0

संतोष पडवळ – प्रतिनिधी

ठाणे ता २७ फेब्रुवारी : प्रशांत कोरटकर (नागपूर) या व्यक्तीने इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोन कॉल करून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व मांसाहेब जिजाऊ यांच्याबद्दल हिणकस व गलिच्छ वक्तव्ये करून बदनामी केली आहे. तसेच संबंधित व्यक्तीने विकृत लेखक जेम्स लेन याने केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि मांसाहेब जिजाऊ यांच्याबद्दलच्या अत्यंत विकृत लिखाणाचे समर्थन करून तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. मराठा समाजाला शिवीगाळ करून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी आज संभाजी ब्रिगेड ठाणे महानगरच्या वतीने संदीप माने (मा.उपजिल्हाधिकारी ठाणे) यांना प्रशांत कोरटकर (नागपूर) या व्यक्ती वर महापुरुषांची बदनामी, धार्मिक भावना दुखावणे, समाजिक तेढ निर्माण करणे तसेच जीवे मारण्याची धमकी देणे या प्रकरणी गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यासाठी निवेदन देण्यात आले. सदर प्रसंगी संभाजी ब्रिगेड ठाणेच्या वतीने संभाजी ब्रिगेड ठाणे महानगर अध्यक्ष सुजय सावंत, सचिव संजीव येद्रे, कार्याध्यक्ष कृष्णा सावळे, सदस्य राजेश भोसले उपस्थित होते.

प्रशांत कोरटकर (नागपूर) या व्यक्तीवर महापुरुषांची बदनामी करणे, धार्मिक भावना दुखावणे, सामाजिक तेढ निर्माण करणे व जीवे मारण्याच्या धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करावी या करिता महाराष्ट्रभर संभाजी ब्रिगेड च्या वतीने मा. जिल्हाधिकारी तसेच मा.पोलीस आयुक्त यांना निवेदन देण्यात आले आहेत. तसेच या विकृत माणसाची त्याला शोभेल अशी धिंड काढणाऱ्या व्यक्तीसाठी संभाजी ब्रिगेड च्या वतीने एक लाख रोख बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
महापुरुषांवर व्यक्तीवर अशा प्रकारची गरळ ओकण्याचे सत्र सध्या महाराष्ट्रात अनुभवायला मिळत आहे आणि अशा प्रकारची मानसिकता हेतू पुरस्सर समाजात पसरवण्याचा हा कुटील डाव असल्याचा दाट संशय पुरोगामी महाराष्ट्रातील अनेक विचारवंत व्यक्त करत आहेत. अशा प्रकारची नीच आणि विकृत गरळ ओकणाऱ्या व्यक्तीवर कायमचा पायबंद व्हावा याकरिता एक भक्कम कायदा अमलात आणला गेला पाहिजे असे मत संभाजी ब्रिगेड ठाणे महानगर अध्यक्ष सुजयजी सावंत यांनी श्री. संदीप माने साहेब (मा.उपजिल्हाधिकारी ठाणे) यांच्या समोर सदर निवेदन देताना व्यक्त केले. त्यावर शासन दरबारीं आपले मत अवश्य पोहोच केले जाईल अशी हमी मा. उपजिल्हाधिकारी यांनी दिली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

   

You may have missed

error: Content is protected !!