दिव्यातील आर एन विद्यालयात फूड फेस्टिव्हल संपन्न. संचालिका रेश्मा पवार यांनी केले विद्यार्थ्यांचे कौतुक.

संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, दिवा ता २७ फेब्रु : दिवा शहरातील बेडेकर नगर, चिन्मय गेट येथील आर एन विद्यालय व जुनिअर कॉलेज आयोजित खाद्य महोत्सव २०२५ व मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन करण्यात आले होते. आर एन विद्यालयात गुरुवारी सकाळ व दुपार सत्रात मराठी व इंग्रजी माध्यमच्या शालेय विद्यार्थ्यांचा खाद्य महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. तसेच मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यां व शिक्षकांनी महाराष्ट्रीयन वेशभूषा करून मराठी संस्कृतीचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. प्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनी आपला कलागुण दाखवून विविध खाद्य पदार्थ तयार केले. ज्याचे शाळेतील शिक्षक व पालकांनी भरभरून कौतुक केले.
आर एन विद्यालयाने शिक्षण क्षेत्रात स्वतःची ऐक वेगळी ओळख निर्माण केली आहे. विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या माध्यमातून वेळोवेळी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. शाळेच्या संचालिका रेश्मा पवार व मुख्याध्यापिका यांनी सांगितले की फूड फेस्टिव्हलमध्ये विद्यार्थ्यांकडून तयार करण्यात आलेल्याची सर्वांनी चव शिक्षकांसह पालकांनी देखील चाखली. आत्मनिर्भय या संकल्पनेतून शालेय विदयार्थ्यांनी विविध प्रकारचे खाद्यपदार्थ स्टॉल उभे करून खाद्यपदार्थांची विक्री केली प्रसंगी शाळेच्या संचालिका रेश्मा नरेश पवार यांच्यासह मुख्याध्यापिका यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. फूड फेस्टिव्हलच्या यशस्वी आयोजनानंतर सौ. पवार यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचे आभार व्यक्त करून अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबनाची भावना निर्माण होते व विद्यार्थी आत्मनिर्भर होऊन कार्यकुशल बनतात असे त्यांनी बोलताना स्पष्ट केल तसेच पालकांनीही विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे कौतुक केले उशिरा पर्यन्त उपक्रमाची रेलचेल सुरु होती.