दिव्यात हनुमान मंदीराचा जिर्णोध्दार आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा.

संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, दिवा ता २८ फेब्रु :
दिवा पश्चिम येथील हनुमान मंदीराचा जिर्णोध्दार आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा फाल्गुन शुद्ध तृतीया शके १९४६ रविवार दि. ०२/०३/२०२५ रोजी श्रीगणेश, श्रीहनुमान, श्रीराम लक्ष्मण आणि सीता मूर्तीची प्राणप्रतिष्ठा प. पू. बालयोगी सदानंद महाराज (तुंगारेवर पर्वत) यांच्या शुभ हस्ते होणार आहे.
शुक्रवार दि २८ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९ वाजता मूर्तीची भव्य मिरवणूक सोहळा आयोजित करण्यात आला होता प्रसंगी दिवा गाव ग्रामस्थासह महिला भगिनी तरुण-तरुणी मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाले होते. प्रसंगी अनेक मान्यवर व दिवेकर भाविक सहभागी झाले होते. सदर पालखी व मूर्ती सोहळा हनुमान मंदिर – कुलस्वामिनी मंदिर गावदेवी मंदिर असा हा मूर्ती मिरवणूक सोहळा आयोजित करण्यात आला होता. मोठ्या उत्साहात पालखी व देवतांच्या मूर्तीचा हा मिरवणूक सोहळा मोठया उत्साहात पार पडला. शनिवार १ मार्च रोजी कलशयात्रायात्रा निघणार असून रविवार दि २ मार्च रोजी सकाळी ११ वाजता श्री गणेश, श्री राम, लक्ष्मण, सीता, श्री हनुमान मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार असून दिवा गाव ग्रामस्थांच्या वतीने सदर सोहळ्यास उपस्थिती राहण्याचे आवाहन करण्यात आले असून रविवारी दुपारी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.