रायगड प्रेस क्लबची कार्यकारणी जाहीर ; अध्यक्षपदी प्रशांत गोपाळे यांची नियुक्ती.

0

कर्जत: सुमित क्षीरसागर

कर्जत (रायगड) ता २ मार्च : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असणाऱ्या रायगड प्रेस क्लबच्या 2025-26 व 2026-27 या पुढील दोन वर्षासाठी नवीन पदाधिकाऱ्यान्ची निवड मराठी पत्रकार परिषदेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर यांचे नेतृत्वाखाली व विभागीय सचिव मनोज खांबे यांचे अध्यक्षतेखाली जाहीर करण्यात आली. यात अध्यक्ष पदासाठी प्रशांत गोपाळे यांची निवड झाली. तर कार्याध्यक्षपदी संजय मोहिते, उपाध्यक्ष पदी अनिल मोरे, व सचिव पदी दरवेश पालकर यांची बहुमताने निवड करण्यात आली. यापुढील इतर पदाधिकारी पुढील आठवड्यात नियुक्त करण्यात येणार आहेत.असे कोकण विभागीय सचिव तथा निवड अध्यक्ष मनोज खांबे यांनी पनवेल येथील साई बँकवेट हॉल येथे जाहीर केले. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे स्वागत राज्य अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर, व मनोज खांबे यांनी केले.

आजच्या जिल्हा निवड प्रसंगी राज्य अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर, कोकण विभाग सचिव मनोज खांबे, रायगड जिल्हा प्रेस क्लब अध्यक्ष प्रशांत गोपाळे, माजी अध्यक्ष अभय आपटे, जिल्हा सचिव अनिल मोरे, पनवेल तालुका प्रेस क्लब अध्यक्ष शेडगे
यासह माजी कोकण विभाग सचिव अनिल भोळे, माजी जिल्हा अध्यक्ष विजय मोकल, भारत रंजणकर, विजय पवार यासंह जिल्ह्यातील पत्रकार उपस्थित होते.

ही निवड होण्यापुर्वी पनवेल तालुका प्रेस क्लबने नेत्र तपासणी शिबीर आयोजित केले होते. यात तालुक्यातील ड्रायव्हर व पत्रकारांची मोतीबिंदू तपासणी करण्यात आली. या शिबिराप्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे, पनवेल शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पनवेल वाहतूक वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील, भाजप उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस तथा माजी नगरसेवक, नितीन पाटील, व सुहास हळदीपूरकर नेत्र टीम चे प्रमुख सुहास हळदीपूरकर, यासह पनवेल प्रेस क्लब अध्यक्ष प्रशांत शेडगे, आदिसंह पनवेल येथील पत्रकार उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

   

You may have missed

error: Content is protected !!