राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे नेरळ शहर अध्यक्ष धनाजी गरूड यांचा भाजपात पक्ष प्रवेश.

नेरळ : सुमित क्षिरसागर
नेरळ राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे नेरळ शहर अध्यक्ष धनाजी गरूड यांच्यासह प्रमोद डांगरे, देवा गवळी, दिलीप राणे, मुकुंद मसणे, गोविंद गवळी, पंडित शिंदे, आदींचा भाजपा रायगड जिल्हा सरचिटणीस मंगेश म्हसकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष तथा माजी मंत्री रवींद्र चव्हाण व आमदार प्रशांतदादा ठाकूर तसेच माजी आमदार सुरेश लाड भाजपा जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. सदर पक्ष प्रवेस हा माजी आमदार सुरेश लाड यांचे कर्जत येथील कार्यालयात पार पडला. या पक्ष प्रवेशा प्रसंगी भाजपा कर्जत-खालापूर विधानसभेचे संर्पक प्रमुख किरण ठाकरे, सुनील गोगटे, नितिन कांदळगावकर, कर्जत तालुका अध्यक्ष राजेश भगत ,ज्येष्ठ नेते तानाजी चव्हाण माजी नगराध्यक्ष शरद लाड,राजेश लाड, नरेश मसणे, संभाजी गरुड, अनिल जैन, संतोष धुळे, योगेश देशमुख, ऋषिकेश दाभाडे, गणेश भोईर, बाळा भोईर, कृष्णा एनकर, तुषार देशमुख, प्रवीण सकपाळ, आकाश चौधरी, विलास पाटील, प्रकाश पेमारे, नरेंद्र कराळे, संतोष शिंगाडे, ऋषिकेश जोशी , प्रश्नेश खेडकर आदी कार्यकर्ते उपस्थित होत.