⭕️ठाण्यातील चार जणांचा नेपाळ देशातील खासगी एअरलाइन्सचे विमान आपघातात दुर्दैवी मृत्यू

0

ठाणे, ता 30 मे : – ठाण्यातील चार जणांचा नेपाळ देशातील खासगी एअरलाइन्सचे विमान आपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ठाण्यातील रुस्तमजी मध्ये राहणारे अशोक त्रिपाठी, पत्नी वैभवी त्रिपाठी व त्यांचा मुलगा व मुलगी हे सदर विमानाने प्रवास करताना बेपत्ता झालेल्या विमानाचा लष्कराने शोध घेतला. हे विमान हिमालयातील मानापाथीच्या खालच्या भागात दिसले. तसेच हे विमान मुस्तांगच्या कोवांग गावात सापडले. १९ आसन असलेल्या या विमानात 4 भारतीय, 4 विदेशी आणि 13 नेपाळी प्रवासी होते. या दुर्घटनेच्या अधिक तपासानंतर सोमवारी नेपाळी खासगी एअरलाइन्सचे  विमान रविवारी जिथे कोसळले ते ठिकाण शोधून काढले. नेपाळी लष्कराच्या प्रवक्ते नारायण सिलवाल यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये ‘शोध आणि बचाव पथकांनी विमान अपघाताचे ठिकाण शोधले आहे’, असे लिहिले आहे.
पोलिस निरीक्षक राजकुमार तमांग यांच्या नेतृत्वाखालील पथक विमान अपघातास्थळी पोहोचले. या अपघातात मृत्यू झालेल्या काही प्रवाशांच्या मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नसून पोलीस अवशेष गोळा करत आहेत. दरम्यान,तारा एअरच्या विमानाचा शोध घेण्यासाठी बचावकार्य पुन्हा सुरू करण्यात आल्याचे नेपाळ लष्कराने सोमवारी सांगितले. रविवारी मुस्तांग जिल्ह्यात बर्फवृष्टी झाल्यानंतर अपघातग्रस्त विमानाच्या शोधात तैनात असलेले सर्व हेलिकॉप्टर थांबवण्यात आले होते.

स्थानिकांनी नेपाळ लष्कराला दिलेल्या माहितीनुसार, तारा एअरचे विमान मानपती हिमाल येथे भूस्खलनामुळे लामचे नदीच्या मुखाशी कोसळले. 19 आसनी या विमानात 4 भारतीय, 3 परदेशी आणि 13 नेपाळी नागरिक होते. मिळालेल्या माहितीनुसार, लष्कराच्या अधिकाऱ्यांना दूरवरून धूर निघताना दिसला, त्यानंतर विमानाचा शोध घेण्यात आला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!