ब्रेकिंग ; ठाणे भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक यांच्यासह भुकरमापक ७५ हजारांची लाच घेताना ACB कडून अटक.

0

संतोष पडवळ – प्रतिनिधी

ठाणे ता ६ मार्च : ठाणे भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक यांच्यासह भुकरमापक ७५ हजारांची लाच घेताना ACB कडून अटक करण्यात आली आहे. आरोपी लोकसेवक 1) चांगदेव गोविंद मोहळकर, वय 39, उप अधीक्षक, भूमी अभिलेख ठाणे , वर्ग 2
रा. लोधा अमारा, विंग 21, 706, कोळशेत रोड, ठाणे तसेच आरोपी 2) श्रीकांत विश्वास रावते , वय 43, पद- भूकरमापक, भूमी अभिलेख ठाणे वर्ग 3
राहणार- बी- 5, 702, स्वस्तिक पार्क ,ब्रह्मांड ठाणे यांना अटक करण्यात आली आहे.

तक्रारदार यांच्या जागेशी निगडित लोकसेवक रावते यांनी सदरचची जमीन मोजणी केलेल्या पोट विषयाची क- प्रत नकाशा करून देण्यासाठी 100,000/- रुपयांची मागणी केली तसेच लोकसेवक मोहोळकर उपाधीक्षक यांनी यापूर्वी एक लाख 95 हजार रुपये लाच घेतल्या बाबत दिनांक 27/02/2025 रोजी तक्रार प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने पडताळणी केली असता यातील तक्रारदार यांचे कडे लोकसेवक रावते यांनी 1,00,000/- रुपयांची मागणी करून तडजोडअंती 75,000/- रुपये ची मागणी केल्याने तसेच लोकसेवक मोहोळकर यांनी त्यांचे अधिनस्त कर्मचारी यांचे करिता लाचेच्या रकमेची मागणी करून तक्रारदार यांना लाचेची रक्कम देण्यास प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले त्या अनुषंगाने दि.०५/०३/२५ रोजी सापळा कारवाई दरम्यान लोकसेवा रावते यांना लाचेची रक्कम 75,000/- रुपये स्वीकारताना आरोपीतास सापळा पथकाने रंगेहात पकडले असून लोकसेवक मोहोळकर यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे म्हणून सापळा अधिकारी
धर्मराज सोनके
पोलीस उपअधिक्षक ए.सी.बी.ठाणे व सापळा पथक पो हवा/ रवींद्र सोनवणे, पो.हवा जयश्री पवार, पोना / विनोद जाधव तर मार्गदर्शन अधिकारी मा.श्री. शिवराज पाटील, पोलिस अधीक्षक, एसीबी, ठाणे परिक्षेत्र, मा.सुहास शिंदे सो अप्पर पोलीस अधीक्षक
एसीबी ठाणे परिक्षेत्र, मा.श्री.संजय गोविलकर सो, अप्पर पोलीस अधीक्षक, एसीबी, ठाणे परिक्षेत्र यांची कारवाई.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

   

You may have missed

error: Content is protected !!