अभिष्टचिंतनाच्या निमित्ताने माजी मंत्री कपिल पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव….

भिवंडी: सुमित क्षिरसागर
माजी राज्यमंत्री कपिल पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा विविध मान्यवरांच्या हस्ते पार पडला. पदाधिकाऱ्यांच्या आग्रहाखातर पाटील यांनी केक कापून शुभेच्छा स्वीकारल्या.
कपिल पाटील यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघातील पक्षाचे कार्यकर्ते व मतदारांसोबत सातत्याने जनसंवाद ठेवत नागरी समस्या सोडवण्याचे काम सुरू ठेवले आहे. त्यामुळे माजी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ९ वाजल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत हजारो नागरिक कार्यकर्त्यांनी कपिल पाटील यांना अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने शुभेच्छा देत त्यांचा सन्मान केला.
यावेळी माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी मंत्री भारती पवार,माजी खासदार संजीव नाईक, शिवसेनेचे नेते प्रकाश पाटील,आमदार शांताराम मोरे, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, प्रांत अमित सानप, माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे,
दीपेश म्हात्रे, गोल्डन मॅन आकाश मालव, निशिकांत मालव, उद्योजक प्रशांत पाटील, जिल्हा परिषद सदस्य देवेश पाटील, मनपा सभागृह नेता सुमित पाटील, सिद्धेश पाटील, कल्पित पाटील,श्रीकांत गायकर, राम माळी यांच्यासह उद्योजक, सर्व पक्षीय मान्यवर, विविध क्षेत्रातील मान्यवर व पदाधिकारी, शासकीय अधिकारी, सामाजिक व सांस्कृतिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी कपिल पाटील यांना शुभेच्छा दिल्या.