महिलादिनी दिवा शिवसेना आयोजित हळदीकुंकू व खेळ पैठणीचा. शिवसेना युवा शहर अधिकारी साक्षी मढवी यांचे आवाहन.

संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, दिवा ता ७ मार्च : शिवसेना दिवा शहर वतीने जागतिक महिला दिनीनिमित्त हळदीकुंकू समारंभ व महिलासाठी सांस्कृतिक उपक्रम म्हणून होम मिनिष्टर खेळ पैठणीचा आयोजित करण्यात आला आहे तसेच कर्तबगार महिलांचा सन्मान देखील यावेळी करण्यात येणार आहे या उपक्रमाला दिव्यातील तमाम महिला व माता भगिनींनी उपस्थित राहवे असे शिवसेनेच्या युवा शहर अधिकारी साक्षी रमाकांत मढवी यांनी आवाहन केले आहे
दरवर्षी जागतिक महिला दिन ८ मार्चला साजरा केला जातो. ८ मार्चचा हा खास दिवस महिलांना समान हक्क आणि सन्मान मिळण्यासाठी तसेच त्यांच्यात जागरुकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो.संपूर्ण जगभरात महिलांनी विविध क्षेत्रात उत्तुंग झेप घेतली आहे. काबाडकष्ट करून आणि कुटुंबाची जबाबदारी पार पाडत महिलांनी अनेक क्षेत्रात यशाचं उंच शिखर गाठलं आहे. महिलांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी, अशा उद्देशाने वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं असे यावेळी कु. साक्षी मढवी यांनी बोलताना स्पष्ट केले आहे.