दिवा शहर हे एक आदर्श शहर झाल्याशिवाय राहणार नाही – गोपाळ लांडगे, जिल्हाप्रमुख. शिवसेना
ठाणे / दिवा ता 30 मे (प्रतिनिधी) दिवेकरांसाठी भविष्यात कस्टरचा प्रश्न येणार आहे.तुम्हाला अधिकृत पक्के घरच नाही तर दुप्पट जागा मिळणार आहे.आत्तापर्यंत जे हाल तुम्ही सोसले,ते बरेचसे आपल्या आठ नगरसेवकांच्या माध्यमातून मार्गी लागलेत.यासाठी आमदार,खासदार साहेब आणि सर्व नगरसेवक तुमच्या सोबत आहेत.त्यामुळे तुम्हाला निश्चितपणे सांगतो की,दिवा शहर हे एक आदर्श शहर झाल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाध्यक्ष श्री गोपाळ लांडगे यांनी आज दिव्यातील शिवसंपर्क अभियानात केले.
मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार दिवा येथे दुसऱ्या टप्प्यातील शिवसंपर्क अभियान दिवा शहरांमार्फत सुरु करण्यात आले आहे.हे अभियान बी.आर.नगर येथील आकांक्षा हाँल येथे पार पडले.यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून श्री गोपाळ लांडगे यांनी वरील वक्तव्य केले.
गेल्या अडीज वर्षात शिवसेनेने जे काही विकासकामे केलेली आहेत.ती लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी ,सर्वसामान्यांच्या वेदना जाणून घेण्यासाठी या उपक्रमाचे स्वरुप होते.यावेळी विचारपीठावर जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे,शिवसेना भवनच्या प्रवक्त्या सुवर्णा वाळुंज, ठाणे जिल्हा प्रमुख वक्ते श्री राहूल लोंढे,शिवसेना दिवा शहरप्रमुख आणि माजी उपमहापौर रमाकांत मढवी,श्री गणेश मुंडे, माजी नगरसेवक श्री अमर पाटील,मा.नगरसेवक दिपक जाधव,मा.नगरसेवक शैलेशजी पाटील,मा.नगरसेविका सुनिताताई मुंडे, मा.नगरसेविका दर्शनाताई म्हात्रे,मा.नगरसेविका दिपालीताई भगत,मा.नगरसेविका अंकिताताई पाटील,श्री उमेश भगत, श्री भालचंद्र भगत,अँड.श्री आदेश भगत,श्री निलेश पाटील, श्री.सचिन पाटील, श्री गुरुनाथ पाटील आदींसह शिवसेनेचे दिव्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
*मतदारांशी संपर्क करा*
श्री गोपाळ लांडगे पुढे कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले की, सध्याच्या डिजीटल युगात सोशल मिडीयाला सर्वाधित महत्व आलं आहे. फेसबुक,व्हाट्सअँपच्या माध्यमातून आपण केलेलं काम सर्वत्र पोहचलंच पाहीजे.आपण सर्वत्र पोहचलो तरी,शिवसेनेच्या मतदारांची अशी अपेक्षा असते की, नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी मला विचारावं.मला भेटावे,माझ्याशी बोलावं ती पुर्तता करणे अत्यंत आवश्यक आहे.यामध्ये हयगय करता कामा नये.लोकांशी नियमित संवाद साधणे गरजेचे आहे.
*मतदारांना दुखवू नका*
जर कोणत्याही मदरांनी आपल्याकडे काम आणलं तर त्यांना दुखवू नका. आलेलं काम आपल्याकडून होत नसेल ते काम कसं होणार नाही हे न सांगता वरिष्ठांपर्यंत पोहचवा. त्यातून मार्ग निघेल. जेणेकडून एखादं काम झालं नाही तर ती व्यक्ती नाराज होते. त्यांच्या कामासाठी पाठपुरावा कायम ठेवा. त्यांच्या कामासाठीही अधिक आत्मियतेने वेळ द्या. एखादे काम नाही झाले तरी आपण दिलेल्या वेळेमुळे ती व्यक्ती आपलं नाव नक्कीच काढेल.त्यामुळे कोणतेही काम अधिक प्रमाणात चालू ठेवा.
विकासाला खोडा घालण्याचे काम भाजपवाले करताहेत – राहुल लोंढे,प्रवक्ते ठाणे शिवसेना
भारतीय जनता पार्टी आणि त्यांचा सुपारी घेतलेला पक्ष तुम्हा दिवेकरांना भडकविण्याचे,प्रलोभने दाखविण्याचे,आमिषे दाखविण्याचे किंवा तुमच्यामध्ये मतभेद आणि मनभेद निर्माण करण्याचे प्रयत्न करतील. त्याला भुलू नका, एका बाजूला कुठे विकास सुरु आहे,परंतु त्या विकास कामांना कुठे खोडा घालण्याचे काम हे भाजपवाले करायला लागले आहेत.त्यांना जशास तसे उत्तर द्या अश्या प्रतिक्रीया श्री युवा प्रवक्ते श्री राहूल लोंढे यांनी केले आहे.
जनतेच्या कामांमुळे आज ठाणे,कल्याण,उल्हासनगर,अंबरनाथ,बदलापूरमध्ये भगवा,भाईंदरमध्येही सत्ता येणार आहे.आणि यावेळेस नवी मुंबईत गणेश नाईकांनाही घरचा रस्ता दाखवून तिथल्या महापालिकेवर भगवा झेंडा फडकविणार आहोत हे आपण लक्षात ठेवले पाहीजे.आज आपण आठ आहोत.आठ म्हणजे कोणाशी गाठ नाही आता.आठचे आता आपण नऊ झालेलो आहोत. मा.एकनाथ शिंदे साहेबांचे या विभागामध्ये बारिक लक्ष आहे.ज्यांना खऱ्या अर्थाने आपरेशन कसं करायच,समोरच्याची शस्त्रक्रिया कशी करायची हे त्यांना चांगले ठावूक आहे. ज्यांनी त्याचे खरे प्रशिक्षण घेतलेलं आहे त्यांनी 2014 व 2019 ला भाजपा,काँग्रेसचं,मनसे सर्वांना आयसीयुमध्ये टाकून डाॅ.श्रीकांत शिंदे दोनवेळा खासदार झालेले आहेत.
देशाच्या संसदेमध्ये 548 खासदार आहेत.त्या 548 खासदारांना डाँ.श्रीकांत शिंदे यांच्यासमोर उभे करा.मी अभिमानाने सांगतो त्या सर्वांसमोर तुमचे डाँ.श्रीकांत शिंदेच नंबर वन आहेत.दिव्यातील रस्ते होताहेत,पाणी योजना येतेय,सांडपाणी योजना येते.कामे आपण प्रचंड प्रमाणात करीत आहोत.गल्ली असतील,चौक असतील,रस्ते असतील,चाळींचा विकास असेल मोठ्या मोठ्या गोष्टी आपण आणतोय.मात्र यात खोडा घालण्याचे काम भाजपामार्फत सुरु आहे.
भाजपाने कोकणी माणसाचा अपमान केला – माजी उपमहापौर रमाकांत मढवी
दिव्यात एका आयोजित सभेत माझ्या कोकणी माणसाचा अपमान केला गेला.तुम्ही दिव्यात कसे राहताय.तुम्हा काही वाटते की नाही? कोकणी माणूस दिव्यात आला.हक्काचे घर असावे म्हणून मेहनतीने घर घेतल.मेहनतीने संसार उभा केला.त्यांच्या या संसाराची चेष्टा करुन भाजपाने अपमान केला असल्याचा हल्लाबोल शिवसेना दिवा शहप्रमुख श्री रमाकांत मढवी यांनी भाजपावर चढविला आहे.
श्री मढवी पुढे म्हणाले की,दिव्यात राहणार कोकणी माणून वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि मा.उद्धवसाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणारा आहे.मोडेन पण कधीही भाजपासमोर झुकणारा नाही.तो कालही शिवसेनेबरोबर होता आणि आजही शिवसेनेबरोबरच आहे.परंतु या बांधवांची ज्यांनी चेष्टा केलीय त्यांना हा माझा कोकणी बांधव 2022 च्या निवडणुकीत मतदानाने हवाच काढील.
*दिवेकरांना सुविधा शिवसेनेकडूनच*
आपण कामे खूप करतो,अनेक सुविधा देतो आहेत, परंतु प्रत्यक्षात त्याची माहीती लोकांपर्यंत पोहचत नाही.सर्वात कमी कुठे पडतो तर आपण सोशल मिडीयाच्या माध्यमात कमी पडतो.त्यामुळे आपण केलेल्या कामांच श्रेय दुसरेच घेत असतात.दिवा शहरात आपणांस प्रकर्षाने जाणवत असेल,दिवा शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात काम सुरु असूनदेखील काम संपत आलं की त्याचे श्रेय घेण्यासाठी कोणतरी अंगावर येतो.परवाची गोष्ट दिवा चौकातजवळ गटाराचं काम सुरु आहे.एका बाजूने वाहतुक सुरु आहे.तिथे उभ्या असलेल्या रिक्षा त्यांच्याच युनियनच्या माध्यमातून चुकीच्या दिशेला उभ्या करुन ट्रफिक जँम करतात.आणि काही गेंड्याच्या कातडीची लोकं ट्राफीक जाम झालं म्हणून बोंबा मारत आहेत.सोशल मिडीयावर सांगत आहेत,शिवसेनेना पाच वर्षात रस्ता पुर्ण करु शकला नाही.या सर्व गोष्टी खरं काय खोटं काय लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे.आणि ते पोहचविणारे माध्यम माझा गटप्रमुख आहे.माझा पोलिंग एजंट आहे.शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख नक्कीच करतील.
येत्या काही काळात दिवेकरांना मुबलक पाणी मिळेल
मला सांगायला अभिमान वाटतं,की दिवा शहर 2002 ते 2021 वर्षात उभं राहीले.एवढ्या वर्षात लाखोंची जनता या दिवा शहरात राहण्यास आलीय. सुरवातीला 2 एमएलडी पाणी पुरवठा केला जायचा.आज 32 एमएलडी पाणीपुरवठाही कमी पडतोय. परंतु एक खंत आहे.दिवेकरांना मुबलक पाणी दिल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही.सर्वांना शब्द देतो येत्या काही काळात ही पाण्याची टंचाई कायमस्वरुपी तडीस नेवू. सर्वांना घराघरात पाणी पोहचवायचं आहे.त्यामुळे पुढे सर्वांची साथ खूप महत्वाची आहे.