जागतिक महिलादिनी नेरळ ग्रामपंचायत सफाई महिला कामगारांसह इतर महिलांचा भेटवस्तू देऊन सन्मान. एचडीएफसी सिक्युरिटी लिमिटेड व नेरळचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ नेरळ यांचा संयुक्त उपक्रम

नेरळ: सुमित क्षिरसागर
नेरळ ता ८ मार्च : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन एचडीएफसी सेक्युरिटी लिमिटेड आणि नेरळचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ नेरळ (सामाजिक संस्था) यांच्या संयुक्त विद्यमाने नेरळ मधील महिला सफाई कर्मचारी व तळागाळातील महिलांना भेटवस्तू देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
नेरळ ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रशासक सुचित धनगर यांच्या हस्ते नेरळ ग्रामपंचायत मधील महिला सफाई कामगार व ग्रामपंचायत महिला कर्मचारी व तळागाळातील महिलांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
वर्षभर साफसफाई करून स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता साफसफाई महिला कर्मचारी हे सर्व नागरिकांचे आरोग्य नीट राहावे, यासाठी झटत असतात परंतु त्यांचा सन्मान केवळ एक दिवसांकरिता न होता तो वर्षभर झाला पाहिजे,तसेच तो सन्मान सर्व स्थरातून होणे गरजेचे आहे.
यावेळी नेरळचा राजा मंडळाचे कार्यकर्ते , नेरळ ग्रामपंचायतचे कर्मचारी व एचडीएफसी सिक्युरिटीज लिमिटेड चे अधिकारी उपस्थित होते.