महिलादिनी मुंबईतील अंधेरी येथील नवकिरण मंडळाकडून वृत्तपत्र वाचनाचे जीवनातले महत्व उघड.

0

संतोष पडवळ, ठाणे

मुंबई ता ११ मार्च : मुंबईतील अंधेरी येथील नवकिरण मंडळाचा सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्तच्या महिला दिन वृत्तपत्र वाचन जीवनात किती महत्वाचे आहे ही कल्पना घेऊन साजरा करण्यात आला.
नवकिरण मंडळ हे मागील 50 वर्ष नवकिरण मार्ग चार बंगला अंधेरी (प) या भागात विविध सांस्कृतिक क्रिडा व सामाजिक उपक्रम राबवत येत आहेत.
वृत्तपत्राचे वाचन कमी होत असल्यामुळे वृत्तपत्र वाचनांचे जीवनातले महत्व ही कल्पना घेऊन नवकिरण मंडळाने महिला दिन साजरा केला. यामध्ये दोनशे महिलांने सहभाग घेतला. नवकिरण पैठणी व विविध स्पर्धकांना विविध बक्षिसांचे वाटप करण्यात आले. वृतपत्र का वाचावे या प्रश्नांचे उत्तर देताना सौ. निशा लुगडे यांनी सांगितले की मी मराठी वृत्तपत्र का आवर्जुन वाचते व आवर्जुन विकत घेते. माझी मुले इंग्रजी जरी शिकत असली तरी त्यांना मराठी भाषा, मराठी संस्कृतीची ओळख व्हावी. मराठी बद्दलचे प्रेम आत्मीयता कायम राहावी. प्रत्येक मराठी भाषिकांनी एक तरी मराठी वृत्तपत्र वाचायला हवे. दुसऱ्या एका तरूण मुलीनी सांगितले की मी वृत्तपत्र वाचत नाही कारण सोशल मिडिया एवढे प्रभावी असताना व मोबाईल मध्ये सर्वकाही उपलब्ध असताना मला वृत्तपत्र वाचनांची गरज वाटत नाही. तिला उत्तर देताना बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे कार्याध्यक्ष व नवकिरण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री. मधुसूदन सदडेकर यांनी सांगितले की सर्व काळ उत्तमच आहेत वाचन करणाऱ्या सर्व व्यक्तीचा सर्वांगीण बौध्दिक विकास होतो तुम्ही जीवनात एवढे सक्षम होऊ शकता की जीवनातील जास्तीत जास्त प्रश्नांना समर्थपणे सामोरे जाऊ शकता. मी वयाच्या 11 वर्षापासून वृत्तपत्र वाचतो. म्हणूनच आज प्रभावीपणे व्यक्त होऊ शकतो, लिहू शकतो व नवकिरण सारखी एक संस्था 50 वर्ष चालवू शकलो. म्हणून स्त्रियांनी आवर्जुन वृत्तपत्र वाचायला हवे व आपल्या मुलांनाही वाचण्यासाठी प्रवृत्त करायला हवे. या समर्पक उत्तर देणाऱ्या दोन महिलांना आकर्षक वॉच देऊन गौरवण्यात आले.
हा कार्यक्रम पार पडण्यास नवकिरण मंडळाचे सेक्रेटरी श्री. सुभाष राणे खजिनदार सौ. रीना मुलिया, श्री. महेंद्र सुर्वे, श्री. नरेंद्र कार्केला , जमुना दोमाटी, सौ. रुचिता पवार, सौ. भाग्यलक्ष्मी यांनी परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

   

You may have missed

error: Content is protected !!