ब्रेकिंग ; रेल्वे क्रॉसिंग तोडून आलेल्या ट्रकला एक्सप्रेसची जोरदार धडक

संतोष पडवळ
ता १४ मार्च 2025
Mumbai-Amravati Express Accident : जळगाव जिल्ह्यातील बोदवड रेल्वे स्थानकाजवळ मुंबई-अमरावती एक्सप्रेसला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. बोदवड रेल्वे स्थानकाजवळ असलेले जुने रेल्वे क्रॉसिंग तोडून धान्याचा ट्रक थेट ट्रॅकवर आला. मुंबई-अमरावती एक्सप्रेसला हा ट्रक धडकला. बोदवड रेल्वे स्थानकावर पहाटे 4 वाजता ही घटना घडली. रेल्वेचा वेग कमी असल्याने मोठा अनर्थ टळला आहे