दिवा-मुंब्रा रेल्वे स्टेशन दरम्यान खाडी किनारी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला.

संतोष पडवळ, दिवा
ठाणे, दिवा ता १४ मार्च : दिवा-मुंब्रा दरम्यान खाडी किनारी मृतदेह आढळून आला आहे. दिनांक १३/०३/२०२५ रोजी ११:२३ वाजताच्या सुमारास मुंब्रा रेल्वे स्टेशनच्या जवळ खाडी किनारील भागात एका अज्ञात व्यक्तीचा (पु./अंदाजे वय-५० वर्षे) या व्यक्तीचा मृतदेह एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. सदर घटनास्थळी मुंब्रा पोलीस अधिकारी व कर्मचारी ०१- शवावाहीकेसह व अग्निशमन दलाचे जवान ०१-रेस्क्यू वाहनासह घटनास्थळी उपस्थित होते. सदर घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने झाडाला लटकलेल्या अवस्थेत असलेल्या व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढून मुंब्रा पोलीस कर्मचारी यांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
सदर व्यक्तीचा मृतदेह मुंब्रा पोलीस कर्मचारी यांनी पुढील कार्यवाहीसाठी शवावाहिकेतून छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे पाठविला आहे.