ब्रेकिंग ; बदलापूरमध्ये इयत्ता १० वीत शिकणाऱ्या चार मुलांचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

संतोष पडवळ, ठाणे
ठाणे, बदलापूर ता १४ मार्च : बदलापूर शहरात एक दु:खद घटना समोर आली आहे. बदलापूर जवळील उल्हास नदीत बुडून चार मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
उल्हास नदीत बुडालेले 4 जण दहावीचे विद्यार्थी होते. धूळवड खेळल्यानंतर चारही जण रंग काढण्यासाठी उल्हास नदीवर गेले होते. मात्र त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे चौघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. चामटोली गावाजवळील पोद्दार गृह संकुलातील मुलं धुळवड संपल्यानंतर रंग काढण्यासाठी उल्हास नदीवर गेली होती. प्रसंगी पाण्याचा अंदाज न आल्याने एक जण बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी गेलेले आर्यन मेदर (15 वर्षे) ,आर्यन सिंग (16 वर्षे) ,सिद्धार्थ सिंग (16 वर्षे) ,ओम तोमर (15 वर्षे) या चौघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
धक्कादायक बाब म्हणजे हे चारहीजण दहावीचे विद्यार्थी होते. 17 तारखेला दहावीचा शेवटचा पेपर आहे. सदर घटनेने पोद्दार गृह संकुलावर शोककळा पसरली आहे.