ठाणे महानगरपालिका निवडणूक आरक्षण जाहीर
ठाणे, ता 31 मे (प्रतिनिधी) : ठाण्याची एकुण लोकसंख्या 15 लाख 18 हजार 762 इतकी आहे. यामध्ये अनुसूचित जाती लोकसंख्या (SC) 1 लाख 26 हजार एवढी असून त्यांच्यासाठी 142 जागा आरक्षित ठेवण्यात आलं आहेत. तर महिलांसाठी 5 जागा राखीव असणार आहेत. ठाण्यातील अनुसूचित जमाती लोकसंख्या 42 हजार 698 आहे. त्यांच्यासाठी 3 प्रभाग राखीव ठेवण्यात आले असून 2 प्रभाग महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत.
एकुण लोकसंख्या :15 लाख18 हजार 762
अनुसूचित जाती लोकसंख्या : 1 लाख 26 हजार
अनुसूचित जमाती लोकसंख्या : 42 हजार 698
एकूण नगरसेवक – 142
एकूण पॅनल – 44
तीनच्या पॅनलचे प्रभाग – 46
चारच्या पॅनलचा प्रभाग – 1
एकूण प्रभाग – 47
ठाणे महानगरपालिकेच्या सन 2022 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) आणि सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याकरीता आरक्षण सोडत ठाणे महापालिकेच्या डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे पार पडली आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय प्रभाग आरक्षित होणार असल्याने ओबीसीच्या जागी खुल्या प्रवर्गातील इच्छुकाला संधी मिळाली आहे. या निवडणुकीत 71 महिला तर 71 पुरुष उमेदवार असणार आहेत. 46 प्रभाग हे तिनचे तर एक प्रभाग चार सदस्यांचा असणार आहे. 142 पैकी 10 जागा आरक्षित ठेवल्या जाणार आहे. त्यापैकी 5 जागा या महिलांसाठी असतील.