दिवा, मुंब्रा आणि कळवा परिसरातील पाणीपुरवठा सोमवार रात्रीपासून मंगळवार रात्रीपर्यंत बंद राहणार

दिवा, मुंब्रा आणि कळवा परिसरातील पाणीपुरवठा सोमवार रात्रीपासून मंगळवार रात्रीपर्यंत बंद राहणार
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे (१६) : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जांभूळ जलशुध्दीकरण केंद्रात, तातडीचे आणि अत्यंत महत्वाचे देखभाल दुरुस्तीचे काम करायचे असल्याने सोमवार, दि. १७/०३/२०२५ रोजी रात्री १२.०० पासून ते मंगळवार दि. १८/०३/२०२५ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत एकूण २४ तासांसाठी कटाई ते ठाणे दरम्यान पाणीपुरवठा बंद राहील. त्यामुळे, त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रात कळवा, मुंब्रा आणि दिवा या परिसरात २४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
तसेच, मंगळवारी रात्री पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील काही तास कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तरी नागरिकांनी आवश्यक तो पाणीसाठा करून ठेवावा तसेच पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेने केले आहे.