दिवा शहरात इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून ग्यालरीचे प्लास्टर कोसळले

दिव्यात इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून ग्यालरीचे प्लास्टर कोसळले
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, दिवा : आज दिनांक १६/०३/२०२५ रोजी १९:२२ वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसारपाटील प्लाझा समोर, एन आर नगर, दिवा (प.), ठाणे या ठिकाणी सिद्धिविनायक अपार्टमेंट (तळ + ०५ मजली इमारत, १० ते १५ वर्ष जुने बांधकाम) या चाळीच्या ३ ऱ्या मजल्यावरील गॅलरीचे प्लास्टर पडले आहे व उर्वरित भाग धोकादायक स्थितीत आहे.*सदर घटनास्थळी कोणालाही दुखापत नाही.
सदरची तक्रार संबंधित विभागामध्ये कळविण्यात आली असून संबंधिताना कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, संबंधित अधिकारी यांनी केलेल्या कार्यवाहीचा कार्यवाहीचा अहवाल आपत्ती व्यवस्थापन कक्षास कळवीला आहे