छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ शिल्पाचे डोंबिवलीत मोठया उत्साहात लोकार्पण.

छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ शिल्पाचे डोंबिवलीत मोठया उत्साहात लोकार्पण.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती.
ठाणे, दिवा ता १७ मार्च : डोंबिवलीत भव्य असा छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ शिल्पाचा लोकार्पण सोहळा मोठया उत्साहात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. न भूतो..न भविष्यती…असा नेत्र दिपक सोहळा पाहण्यासाठी डोंबिवलीत प्रचंड उत्साह दिसून आला. डोंबिवलीच्या प्रवेशद्वारावर घरडा सर्कल येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि ज्यांनी शून्यातून हिंदवी स्वराज्य कसे स्थापन करायचे हे सर्व जगाला दाखवून देणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉ श्रीकांत एकनाथ शिंदे, डोंबिवलीचे आमदार आणि भाजपा कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, हिंदु राष्ट्र सेना अध्यक्ष धनंजय देसाई, कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार राजेश गोवर्धन मोरे आणि शिवसेनेचे पदाधिकारी , लोकप्रतिनिधी , महिला आघाडी युवा व युवतीसेना, शिवसैनिक , शिवप्रेमी नागरिक, हिंदू संघटनांचे सर्व प्रतिनिधी तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रसंगी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त इंदूराणी जाखड तसेच शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे तसेच समाज प्रबोधनकार हभप संग्राम (बापू) भंडारे (आळंदी) यांची विशेष उपस्थिती होती.तसेच शिवसेना दिवा शहरप्रमुख रमाकांत मढवी यांच्यासह दिवा शहरातील सर्व लोकप्रतिनिधी व अनेक पदाधिकारी उपस्थित होते