ठाणे जिल्ह्यातील दुकानदार, आस्थापनांनी राज्य शासनाच्या सुधारित परिपत्रकानुसार मराठी पाट्या मोठ्या आकारमानात व सक्तीने लावण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडे मराठी एकीकरण समितीची मागणी
ठाणे, ता 31 मे (प्रतिनिधी) ठाणे जिल्ह्यातील दुकानदार, आस्थापनांनी राज्य शासनाच्या सुधारित परिपत्रकानुसार जिल्ह्यात मराठी पाट्या मोठ्या आकारमानात व सक्तीने लावण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडे मराठी एकीकरण समितीने केली मागणी केली आहे
महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम, २०१७ सुधारणा २०२२ अन्वये अंमलबजावणी करण्याबाबत मा. जिल्हाधिकारी, सहा महानगरपालिका आयुक्त व मुख्याधिकारी जिल्हा परिषद, ठाणे यांच्याकडे ३० मे २०२२ रोजी ई-मेल द्वारे जिल्ह्यात संबधित कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करण्याबाबत संबंधितांना विहित मुदतीचे जाहीर सूचना प्रसिद्धी पत्र त्याच बरोबर विहित मुदतीनंतर प्रचलित नियमातील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाईस सामोरे जाण्याच्या संबंधितांना स्पष्ट सूचना देण्यात याव्यात अशी मागणी प्रशासनाकडे मराठी एकीकरण समितीने केली मागणी केली आहे तसेच केलेल्या ठोस कार्यवाहीची लेखी प्रत व स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीची माहिती द्यावी अशी विनंती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष श्री आनंदा पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.