दिव्यातील पाणीप्रश्न सुटता सुटेना ; दिवा भाजप आक्रमक भाजपचे डॉ. सतीश केळशीकरांचा गेली तीन वर्षांपासून पाठपुरावा

संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, दिवा ता २१ मार्च : ठाणे महानगर पालिकेच्या हद्दीतील वाढत्या लोकसंख्येच्या दिवा शहरातील पाणी प्रश्न किंवा पाणीटंचाई सोडविण्यास पूर्णत :हा अपयश आलेले पहावयास मिळत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 600 मिमी व्यासाची पाईपलाईन उदघाटन करून देखील दिवेकरांच्या पाण्याविषयी उपेक्षाच वाट्याला आल्या आहेत. हे राजकीय पक्ष्याचे अपयश की ठाणे महानगर पालिका प्रशासनाचे ? दिव्यात महानगरपालिकेच्या नळ जोडणीला पाणी मिळत नाही परंतू विकत देणारी ट्याकंर लॉबीला हवं तेव्हढ पाणी मिळतंय. दिवा शहरात शेकडो ट्याकंर गल्लीबोळात दिसतात. निवडणुका येतात आणी पाणीप्रश्नावर आश्वसने देऊन निवडणूकित जिंकतात पण पाणी टंचाई जैसे थे. दिव्यातील सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न की ग्रामीण भागापेक्षाही दिवा शहराची गंभीर परिस्थिती, किती दिवस विकत पाणी घेणार ? पाण्यासाठी शेकडो निवेदने देऊन पाणी प्रश्न मार्गी लागत नाही. दिवेकरांच्या वाट्याला उपेक्षाच मिळत आहे.
दिवा पश्चिम येथील एन. आर. नगर, क्रिश कॉलनी, नागवाडी, इत्यादी भागात गेली अनेक वर्ष कित्येक हजार लोकांची वस्ती आहे शेकडो इमारती व चाळीच्या घरांची वस्ती आहे. पण त्या परिसरातील नागरिकांना पाण्याच्या भीषण समस्येला तोंड द्यावे लागत आहे. लोकांना पाण्यासाठी तासन तास बिल्डिंगच्या खाली लाईन मध्ये उभे राहावे लागत आहे, तरीसुद्धा कधीकधी पाणी मिळत नाही. भारतीय जनता पार्टीच्या वतीने गेली दोन वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून पाठपुरावा करत आहे. परंतु आजपर्यत पाणी प्रश्न सोडविण्यास प्रशासनाला यश आले नाही परिणामी दिवा भाजप मंडळ अध्यक्ष सचिन भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप युवा मोर्चाचे डॉ. सतीश केळशीकर यांच्यावतीने दिवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त राजेंद्र गिरी यांना स्मरणपत्राद्वारे निवेदन देण्यात आले. प्राणीप्रश्न तात्काळ सोडविण्यात यावा अन्यथा भाजप युवा मोर्चाच्या वतीने उग्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदनातून स्पष्ट करण्यात आले असून प्रसंगी डॉ. सतीश केळशीकर व तेजस पास्टे उपस्थित होते.