दिव्यात शिवसेनेचे सदस्य नोंदणी अभियान सुरु.

संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, दिवा ता २३ मार्च : शिवसेना दिवा शहर आयोजित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सदस्य नोंदणी अभियान 2025 आज सुरु करण्यात आले आहे. दि. 23 मार्च 2025 पासून आपल्या जवळच्या शिवसेना शाखेत नोंदणीसाठी संपर्क करावा असे आवाहन शिवसेना दिवा शहरप्रमुख तथा माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी केल आहे.
शिवसेनेने प्रत्येक विधानसभा क्षेत्रात तीस हजार शिवसैनिकांची सदस्य नोंदणी करण्याचे टार्गेट घेतले आहे. 25 मार्च पर्यंत ही नोंदणी करण्यात येणार आहे. त्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते कामाला लागलेले दिसून येत असून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात 30 हजार सभासद नोंदणीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्ष संघटन आणि बांधणी करण्यात येत आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगल्या पद्धतीने काम केल्याने लोकांच्यातून उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे असे यावेळी दिवा शहर प्रमुख रमाकांत मढवी यांनी बोलताना स्पष्ट केले आहे. प्रसंगी शिवसेना दिवा उपशहर प्रमुख शैलेश पाटील, आदेश भगत, नगरसेविका दीपाली भगत, सुनीता मुंडे, दर्शना चरणदास म्हात्रे, मा. नगरसेवक दीपक जाधव, अमर पाटील, विभाग प्रमुख भालचंद्र भगत, निलेश पाटील, शशिकांत पाटील, उमेश भगत, चरणदास म्हात्रे, विनोद मढवी, जगदीश भंडारी, गुरुनाथ पाटील, सचिन चौबे, अरुण म्हात्रे तसेच युवा अधिकारी साक्षी मढवी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.