आमदार महेंद्र थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त नेरळ मध्ये भव्य मोफत आरोग्य शिबिर..

नेरळ: सुमित क्षिरसागर
आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त “आरोग्याचा महायज्ञ” या उपक्रमाअंतर्गत आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने २० मार्च ते २९ मार्च २०२५ या कालावधीत विविध ठिकाणी मोफत महा आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
आज, २५ मार्च २०२५, या उपक्रमांतर्गत आगरी समाज हॉल, मोहाचीवाडी, नेरळ (ता. कर्जत, जि. रायगड) येथे भव्य आरोग्य शिबिर संपन्न झाले.
आरोग्य शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला असून, नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणी आणि उपचारांचा लाभ घेतला. तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने रुग्ण तपासणी केली आणि आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया व उपचार मार्गदर्शन दिले.
मोफत आरोग्य शिबिराला प्रमुख मान्यवर म्हणून श्री. अंकुश दाभणे (तालुका सचिव), श्री. किसन शिंदे (संपर्कप्रमुख, नेरळ शहर), श्री. सुरेश राणे (पंचायत समिती विभाग प्रमुख, नेरळ), श्री. केतन पोद्दार (नेरळ शहर संघटक), श्री. आशुतोष गडकरी (उपशहर प्रमुख, नेरळ), श्री. पंढरीनाथ चंचे (उपशहर प्रमुख, नेरळ), श्री. जयवंत साळुंखे, श्री. विशाल साळुंखे, श्री. राहत खान, श्री. धनाजी डबरे, श्रीमती वर्षा बोराडे, श्री. सुनील पारधी, श्री. मंगेश म्हसकर (तालुका प्रमुख, भाजप), श्री. पप्पू मसने, श्री. रवी मसने, श्री. नरेंद्र कराळे, श्री. दत्ता ठमके आणि श्री. अनंता मसने उपस्थित होते.
नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
या शिबिरामध्ये मोफत आरोग्य तपासणीसह आयुष्यमान भारत कार्ड E-KYC नोंदणीसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली, जी २० मार्च २०२५ ते २९ मार्च २०२५ या कालावधीत सुरू राहणार आहे. अनेक रुग्णांनी मोफत शस्त्रक्रियेसाठी नोंदणी केली आणि विविध वैद्यकीय सल्ल्यांचा लाभ घेतला.
समाजसेवेतील महत्त्वपूर्ण उपक्रम
सर्व मान्यवरांनी महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या समाजसेवेतील कार्याचे कौतुक केले आणि भविष्यात अशा अधिक उपक्रमांचे आयोजन करण्याची आवश्यकता व्यक्त केली. आरोग्यसेवा गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे मान्यवरांनी सांगितले.