दिव्यातील ठाणे महापालिका शाळेची आधुनिकीकरणासाठी संरचनात्मक दुरुस्थी. शिवसेना शहरप्रमुख रमाकांत मढवी यांच्याहस्ते भूमिपूजन.

संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, दिवा ता २५ मार्च : दिवा शहरातील ठाणे महानगर पालिका शाळा क्रमांक ७९ व ९८ या शाळेच्या इमारतीच्या संरचनात्मक दुरुस्तीच्या कामाचे भूमीपूजन शिवसेना दिवा शहरप्रमुख मा. उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या हस्ते पार पडले. सदर शाळेला ऐक आदर्श ( मॉडेल) दर्जा देण्यासाठी संपूर्ण इमारतीची संरचनात्मक दुरुस्थी हाती घेण्यात आली असून संपूर्ण इमारतीचे अंतर्गत व बाहेरची पडझड, शौचालयांची दुरावस्था व इतर कामे तातडीने व्हावी अशी स्थानिक नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची मागणी केली होती. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी उपलब्ध केलेल्या व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मागणीनुसार व शिवसेना शहरप्रमुख रमाकांत मढवी यांच्या पाठपुराव्यामुळे प्राप्त झालेल्या निधीतून या कामाला आज सुरुवात झाली आहे.
दिवा शिवसेनेच्या प्रयत्नामुळे सदर शाळेच्या अंतर्गत व बाह्य दुरुस्ती बरोबरच शाळेची डागडुजी होणार असल्यामुळे गरजू विद्यार्थ्यांना या मोठा फायदा होणार असल्याचे मत यावेळी शहरप्रमुख रमाकांत मढवी यांनी सांगितले. ठाणे महापालिकेच्या आदर्श शाळा तसेच मूलभूत सोयीसुविधाचा विकास या योजने अंतर्गत शाळेच्या आधुनिकीकरणासाठी संरचनात्मक दुरुस्थी होणार आहे. उच्च व चांगल्या दर्जाच्या शैक्षणिक सुविधा यावेळी उपलब्ध व्हाव्यात व महापालिका शाळेत शिकण्यासाठी विध्यार्थ्यांचा कल वाढावा या दृष्टीकोनातून शाळेचा दर्जा व सुविधा वाढविण्यात येत आहे. यात ठाणे मनपा हद्दीतील 10 शाळांचा समावेश असून अंदाजे 17 कोटी पेक्षा अधिक खर्च अपेक्षित आहे. प्रसंगी दिवा शिवसेना उपशहरप्रमुख तथा मा. नगरसेवक शैलेश पाटील, मा. नगरसेवक अमर पाटील, नगरसेविका दिपाली भगत, उपशहरप्रमुख अँड आदेश भगत, विभागप्रमुख भालचंद्र भगत, उमेश भगत, शाखाप्रमुख नितीन ओतुरकर, उपशाखाप्रमुख भगवान पाटील, सौ.कविता भोसले, सौ.अंजना सुतार व इतर पदाधिकारी उपस्थित होते.