दिवा रेल्वे फाटकात लोकलच्या धडकेत 2 ठार तर ऐक गंभीर जखमी
ठाणे, दिवा. ता 1 जून (प्रतिनिधी) :- दिवा रेल्वे फाटकात लोकलच्या धडकेत 2 ठार तर ऐक गंभीर झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आज सकाळी दिवा रेल्वे स्थानकात 8:21 ची खोपोली लोकल पास होत असताना फाटकातून जाणाऱ्या तिघांना लोकलने उडवले प्रसंगी त्यात दोनजण जागीच ठार झाले तर ऐक जण गंभीर जखमी झाला. मृतामध्ये दीपक शशिकांत सावंत (वय 26), गीता दिलीप शिंदे (वय 35) हे जागीच ठार झाले असून महादेवी अमोल जाधव (वय 25) या गंभीर जखमी झाले असून त्यांना व दोन्हीही मृत हे शिवाजी हॉस्पिटल कळवा याठिकाणी पाठवण्यात आले असून पुढील तपास रेल्वे पोलीस करत आहेत. रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे, दिवा रेल्वे स्टेशन वरील मुंबई दिशेकडे असलेला अरुंद जिना असल्याने प्रवासी फटकातून जातात त्यामुळे असे अपघात होतात, व मुंबई दिशेकडे अस्कलेटर लावल्यास प्रवाशी ब्रीजचा वापर करतील, असे संघर्ष कोकण रेल्वे प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष विजय अनंत भोईर यांनी सांगितले आहे.