नेरळ मध्ये श्री स्वामी समर्थ केंद्र(दिंडोरी प्रणित) केंद्रात श्री स्वामी समर्थ जयंती उत्साहात साजरी.

नेरळ: सुमित क्षिरसागर
नेरळ कर्जत राज्य महामार्गावरील शिवमंदिर रोडला लागून असलेल्या अखिल भारतीय स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित सेवा केंद्रात स्वामी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. स्वामी जयंतीच्या निमित्ताने दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी झाली होती.
श्री स्वामी समर्थ केंद्रात जयंती निमित्ताने दिवसभर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी स्वामी समर्थ महाराजांची पालखी सोहळा करण्यात आल्या नंतर स्वामींची त्रिकाळ आरती करण्यात आली. सामुहिक स्वामी चरित्र सारामृत वाचन करण्यात आले. सायंकाळी नैवेद्य आरती करून स्वामी भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. केंद्रात दर रविवारी व रविवारी संध्याकाळी ६.३० आरतीचे आयोजन करण्यात येते. त्याच बरोबर दर रविवारी बालसंस्कार वर्ग घेतले जातात. या सर्व कार्यक्रमांचे नियोजन केंद्रा मार्फत केले जाते.
या कार्यक्रमासाठी केंद्र प्रतिनिधी मनिषा गोळे, विद्या विरले, मिनाक्षी दहिवलीकर, रघुनाथ विरले, दिलीप शेलार, प्रमोद लोभी, अतुल शहासने, लक्ष्मण कराळे, विजय शिर्के, भावेश गोळे, शंकर शिंदे, सूरज बाच्चम, दिपक जोशी, मनिषा शेलार
क्रांती गोळे, रोहित गोळे, प्रमोद दहिवलीकर व सर्व स्वामी सेवेकरी यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला.