दिवा शहरासाठी शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (कल्याण लोकसभा मतदार संघ) यांनी लोकार्पण केलेली रुग्णवाहिका अज्ञातांनी फोडली

संतोष पडवळ- दिवा, ठाणे
ठाणे : दिवा शहरासाठी शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (कल्याण लोकसभा मतदार संघ) यांनी लोकार्पण केलेली रुग्णवाहिका अज्ञातांनी फोडल्याची घटना घडली आहे. दिवा शहरातील दिवा मोहत्सव मैदानात उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेच्या दोन्हीही दरवाजात मोठे दगड आढळून आले असून सदर दिवा मोहत्सव मैदानात रात्रीच्या वेळी अनेक तळीराम दारू पिण्यास बसलेले असतात अशी प्राथमिक माहिती मिळाली असून स्थानिक रहिवास्यांकडून पोलीस कारवाई करण्याची मागणी होत आहे.