ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते मनोज कुमार यांचे निधन.

संतोष पडवळ, ४ एप्रिल २०२५
मुंबई : ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते मनोज कुमार यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 87 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक वर्षांपासून ते आजारी होते. परंतु, काही दिवसांपूर्वीच त्यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरूबाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, आज शुक्रवारी (ता. 4 एप्रिल) सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. मनोज कुमार हे अभिनेते तर होतेच, पण ते एक उत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक सुद्धा होते. त्यांचे चित्रपट हे देशभक्तीवर आधारित असल्याने त्यांना “भारत कुमार” म्हणूनही ओळखले जायचे. पण त्यांच्या निधनामुळे भारतीय चित्रपटसृष्टीतील एका युगाचा अंत झाला आहे