ठाण्यात ९ एप्रिलला अनेक सामाजिक संघटनांचे जेल भरो आंदोलन.

संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, ता ६ एप्रिल : येत्या ९ एप्रिल रोजी ठाणे जिल्ह्यातील भारत मुक्ति मोर्चा, राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा, बहुजन क्रांति मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा या सामाजिक संघटनांनी राष्ट्रव्यापी जेलभरो आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. सदर संघटनांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत पुढील मुद्दे उपस्थित केले आहे. १) बीजेपी च्या माध्यमातुन बहुजन महापुरुषांचा वारंवार होत असलेला अपमान २) केंद्र सरकारद्वारे ओबीसीची जाती आधारित जनगणना करण्यासाठी तसेच सर्व जाती समूहांची जाती आधारित जनगणना करणे, ३) भारतीय लोकतंत्र वाचविण्यासाठी EVM हटवून बॅलेट पेपरवर सर्व निवडणुका घ्याव्यात. ४) बोधगया येथील महाबोधी महाविहार ब्राम्हणांच्या ताब्यातून मुक्त करावे आदी मुद्द्यांवर आधारित होत असलेल्या राष्ट्रव्यापी जेलभरो आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
येत्या ९ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ वाजता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालया समोर राष्ट्रव्यापी जेलभरो आंदोलन होणार असल्याचे पत्रकार परिषदेत संजय ढिलपे (प्रशिक्षण महासचिव, भारत मुक्ति मोर्चा, महाराष्ट्र राज्य), सिद्धांत बर्वे (ठाणे जिल्हा प्रभारी, भारत मुक्ति मोर्चा), शैलेश साळवे (ठाणे जिल्हाध्यक्ष, भारत मुक्ति मोर्चा), आशाताई साळवे (ठाणे जिल्हाध्यक्षा, भारत मुक्ति मोर्चा-महिला संघ), विशाल पडघने (ठाणे जिल्हाध्यक्ष, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क), रवि भगत (उल्हासनगर विधानसभा सदस्य, बहुजन मुक्ति पार्टी), संदिप खरचन (भारतीय युवा मोर्चा, ठाणे), निलेश येलवे ( ठाणे जिल्हाध्यक्ष, बहुजन मुक्ति पार्टी), सूनयना हंडोरे (महासचिव, नॅशनल अट्रोसिटी प्रेवेंशन फोर्स), सुशांत गायकवाड (प्रभारी बहुजन क्रांती मोर्चा) स्पष्ट केले असून सदर आंदोलनाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.