दिव्यात श्री रामनवमीचा उत्साह शिगेला ; शोभायात्रा उत्साहात संपन्न.

संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, दिवा ता ६ एप्रिल : श्री रामनवमी निमित्त सालाबादप्रमाणे यंदाही धडाकेबाज युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य दिवा शहर यांच्या वतीने दिवा शहरात शोभायात्रा काढण्यात आली. शोभा यात्रा मध्ये प्रमुख आकर्षण हे प्रभू श्री रामचंद्र, सीतामाता लक्ष्मण आणि हनुमान त्यांचे रूप घेतलेले लहान मुले ठरले. कडक ऊन असतानाही भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर शोभा यात्रा शिवसाई महादेव मंदिर, श्लोक नगर येथून श्री रामाची आरती करून सुरुवात करत मुंब्रादेवी कॉलनी, दिवा स्टेशन रोड, दिवा आगासन रोड, ग्लोबल स्कूल मार्गे सदाशिव दळवी नगर पर्यंत काढण्यात आली.
संपूर्ण दिवा शहरात जय जय श्रीराम नारा आणि भगवे ध्वज फडकवत भक्त शोभा यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासन उपस्थिती होते. सदर यात्रेत धडाकेबाज युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री अमोल धनराज केंद्रे, उपाध्यक्ष रामपाल मौर्या, कार्याध्यक्ष अभयलाल दुबे, सचिव सौ अश्विनी अमोल केंद्रे, उप सचिव राजू प्रसाद गुप्ता, पिंटू यादव,नितीन आवाडे, विनोद गिरी ,मनोज गिरी,अनिल मौर्या,कमल गुप्ता,राजेश मौर्या,विद्या जैस्वाल ,कविता बामणे,गीता पाणीग्रही,राधिका गुप्ता ,माधुरी शर्मा,प्रदीप गुप्ता,कोंडीबा केंद्रे,महेंद्र घडशी, विनोद कदम,कृष्णा जाधव,रणजीत मौर्य,जीतू प्रजापति,सोनू बैद,अंगेश चौधरी,बाबू मोरे,आशिष पांडे,शंकर कांबळे,पंचम गुप्ता, कुशाल पांडे,आदित्य भारती,आशुतोष पाडी,विकास सिंग,चिराग भारद्वाज,संदीप भारद्वाज, हरिओम यादव,राजू खरात तसेच श्री राम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.धडाकेबाज युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री अमोल धनराज केंद्रे यांची पोलिस प्रशासनाचे तसेच सहभागी झालेल्या श्री राम भक्तांचे मनपूर्वक आभार मानले.