ब्रेकिंग ; मुंब्र्यात इमारतीच्या डक्ट मध्ये १० वर्षीय मुलगी पडून दुर्दैवी मृत्यू.

संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, दिवा ता ८ एप्रिल : दिनांक ०७/०४/२०२५ रोजी रात्री ११ : ४८ वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार श्रद्धा प्राप्ती बिल्डिंग, सम्राट नगर, मुंब्रा, ठाणे. या ठिकाणी श्रद्धा प्राप्ती बिल्डिंग (तळ + १० मजली इमारत) या इमारतीच्या आतील बाजूस असलेल्या व्हेंटिलेशन डक्टमध्ये *कु. रोशनी व्यंकटेश सगदिंन. (स्त्री, वय- १० वर्षे, राहणार – मुंब्रादेवी अपार्टमेंट, गिरीश टॉवरच्या बाजूला, ठाकूरपाडा मुंब्रा.) यांचा पडून मृत्यू झाला होता. सदर घटनास्थळी मुंब्रा पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान – १ रेस्क्यू वाहनासह व ०१ – खाजगी रुग्णवाहिकेसह उपस्थित होते.
सदर इमारतीच्या व्हेंटिलेशन डक्ट मध्ये पडलेल्या मुलीचा मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांकडून बाहेर काढण्यात आला असून मुंब्रा पोलीस कर्मचारी यांनी सदर मृतदेह रुग्णवाहिकेमधून पुढील कार्यवाही करिता छ.शि.म. रुग्णालय, कळवा या ठिकाणी दाखला केला आहे. पुढील तपास मुंब्रा पोलीस स्टेशन यांच्याकडून करण्यात येणार आहे.