ब्रेकिंग : दिव्यातील दातीवली तलावाचा काही भाग कोसळला ; रिक्षासह दुचाकीचे नुकसान

संतोष पडवळ, दिवा
ता ११ एप्रिल २०२५
दिवा : तलावांचे शहर असलेल्या ठाणे महानगर पालिकेच्या हद्दीतील दिव्यातील दातीवली तलावाचा काही भाग आज पहाटे ५ वाजता कोसळल्याची घटना घडली आहे. गेली दोन अडीच वर्षापासून शुशोभिकरणाचे रखडलेले काम दिसून येत असून सदर दातीवली तलावाचे काम पूर्णतःवास येताना दिसत नसून अतिशय कासव गतीने काम सुरु असून प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास येत आहे. सदरचा आपघात दिवसा झाला असता तर जीवितहानी होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत असून आज पहाटे काम सुरु असलेल्या तलावाचा काही भाग कोसळल्याने ऐक रिक्षा व ऐक दुचाकी आत कोसळली असता रिक्षासह दुचाकीचे नुकसान झाले असून सदर रखडलेल्या तलावाच्या कामावर दिवेकरांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.