दिव्यात १३४ व्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह शिगेला

संतोष पडवळ (दिवा)
ता १४ एप्रिल २०२५
दिव्यात १३४ व्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह शिगेला पोहचलेला पहावयास मिळाला. दिवा शहर व परिसरात विविध प्रबोधनात्मक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले तर आकर्षक चित्ररथ देखावे, विद्युतरोषणाई, फटाक्यांची आतषबाजी, वाद्यांच्या मिरवणुकीत मोठ्या उत्सवात भिम जयंती साजरी करण्यात आली. प्रसंगी दिवा शहरातील अनेक राजकीय पक्षांनी आपला सहभाग नोंदवला.