धक्कादायक, कचरा वेचणाऱ्या तिघांवर हॉटेल चालकानं उकळतं पाणी ओतल्याने 2 जणांचा मृत्यू तर ऐक गंभीर

0

पुणे, ता 3 जून (ब्युरो रिपोर्ट) : पुण्यात एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. कचरा वेचणाऱ्या तिघांवर एका हॉटेल चालकानं उकळतं पाणी ओतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात दोघांचा मृत्यू झाला असून एक व्यक्ती गंभीररीत्या भाजला गेला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

पुण्यातील सासवड मध्ये हॉटेल चालक पप्पू उर्फ निलेश जयवंत जगताप याच्या हॉटेलजवळील अहिल्यादेवी मार्केट जवळ ओसरीवर दोन भिकारी बसत होते. याचाच राग मनात धरुन जगताप याने या भिकाऱ्यांना काठीने मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या अंगावर हॉटेलमधील उकळतं पाणी टाकले. यात ते पूर्णपणे भाजून निघाले आणि यात दोघांचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना 23 मे रोजी घडली होती. मात्र आता ही घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणातील गंभीर बाब म्हणजे घटनास्थळापासून सासवड पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर आहे, तरीही याप्रकरणी पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही.

या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात असून हॉटेल चालकाविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. मात्र पोलिसांवर स्थानिक आमदारांचा दबाव असल्याचाही आरोप केला जात आहे. सध्या हॉटेल चालक निलेश उर्फ पप्पू जगपात फरार आहे.

दरम्यान, या घटने संदर्भातील काही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. कचरा वेचणारी एक वृद्ध महिला माहिती देत असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या वृद्ध महिलेचाही आता मृत्यू झालाय.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!