ठाणे – मुरुड (सातारा) एस टी बससेवा सुरु.

संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे ता १५ एप्रिल : अनेक दिवसापासून मागणी असलेली ठाणे – सातारा – मुरूड एस टी ची बससेवा आज दिनांक १५ एप्रिल २०२५ पासून वंदना बस स्थानक येथून सुरु करण्यात आली आहे. आमदार संजय केळकर यांच्याहस्ते श्रीफळ फोडून ठाणे सातारा मुरुड या बससेवेला हिरवा कंदील दाखविण्यात आला. ठाण्यातील वंदना बस डेपोतून दररोज सकाळी ९ : ३० वाजता बस सुटणार आहे. या बससेवेचा फायदा सातारा ,भारतगांव , नागठाणे, तारळे, कडवे व मुरुड विभागातील प्रवास्यांसाठी होणार आहे.
ठाणे सातारा मुरुड बस पुणे दुत्रगती मार्गांवरून सातारा अशी धावणार आहे. या प्रसंगी भाजपचे दत्ता घाडगे, गणेश कदम (व्यवस्थापक, फ्री प्रेस वृत्त समूह) संजय गायकवाड , बाळा सपकाळ व यशवंत भगत आदी मान्यवर व इतर सातारा ते मुरुड मार्गांवरील अनेक प्रवासी उपस्थित होते.