महाराष्ट्रात पुन्हा मास्क वापरण्याचं आवाहन – राजेश टोपे, आरोग्यमंत्री
मुंबई, ता 4 जून (प्रतिनिधी) महाराष्ट्रात पुन्हा एकदा मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. राज्यातील सार्वजनिक ठिकाणी, तसेच बंदिस्त ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या संदर्भात राज्याच्या आरोग्य सचिवांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं, राज्यात काही जिल्ह्यांत रुग्णवाढ होत आहे. त्यात मुंबई, ठाणे, पुणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांचा समावेश आहे. ज्या ठिकाणी रुग्णवाढ होत आहे त्या ठिकाणी आपण मास्क वापरण्याचं आवाहन करावं. मास्क सक्ती करण्यात आलेली नाहीये. त्यादृष्टीने 10 -15 दिवस रुग्णवाढ होत असलेल्या ठिकाणी आणि बंदिस्त ठिकाणी मास्क वापरायला हवा. ज्यामध्ये बसेस, लोकल ट्रेन, ऑफिस, शाळा, सिनेमागृह, सभागृह, मॉल्स अशा ठिकाणी मास्क वापरावे. इतर ठिकाणी मास्क वापरण्यावर शिथिलता असावी.