दिव्यातील विविध रेल्वे प्रश्नावर भाजपनी घेतली रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट
ठाणे, दिवा ता 4 जून (प्रतिनिधी) :-आगासन गावातील रेल्वे थांबा तातडीने सुरू करावा तसेच दिवा स्थानकात सरकते जिने,पूर्वेला आरक्षण केंद्र व तिकीट घर मिळावे या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या दिवा पदाधिकारी यांनी केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली.या भेटी दरम्यान सर्व प्रश्नावर सकारात्मक विचार केला जाईल असे सांगताना दानवे यांनी आपण लवकरच दिवा स्थानकाचा दौरा करू असे आश्वासन दिले.
भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन दिवा स्थानकातील समस्या मांडल्या.आगासन स्थानकात थांबा सुरू झाल्यास तेथील नागरिकांना, विद्यार्थ्यांना,कामगारवर्गाला येण्या-जाण्यासाठी सुविधा होईल याबाबत सविस्तर माहिती दिली. दिवा स्टेशन येथे सरकता जिना तातडीने तयार करावा अशी मागणी भाजपने केली.दिवा पूर्वेला तिकीट घर व आरक्षण केंद्र मिळावे अशी मागणी यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्याकडे दिवा भाजपच्या शिष्टमंडळाने केली. निवेदन देतेवेळी शिवाजी आव्हाड दिवा मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे ठाणे कार्यकारणी सदस्य अशोक पाटील विजय भोईर गणेश भगत मंडळ सरचिटणीस समीर चव्हाण युवा मोर्चा अध्यक्ष सचिन भोईर महिला मोर्चा अध्यक्षा ज्योती पाटील ओबीसी मोर्चा अध्यक्ष रोशन भगत उपस्थित होते