शाळांकरीता नवी कोविड नियमावली – वर्षा गायकवाड, शिक्षणमंत्री .
मुंबई, ता 5 जून (प्रतिनिधी) : राज्यात कोरोना रुग्णसंख्येचं प्रमाण सातत्याने वाढत आहे. सतर्कता बाळगत राज्य सरकारने देखील नागरिकांना पुन्हा एकदा अलर्ट राहण्याचे आवाहन केलं आहे. कोरोना रुग्णवाढीमुळे चिंता वाढली पण काळजी घेऊन शाळा सुरूहोणार असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.
कोरोना पुन्हा एखदा डोकं वर काढत असल्याने वर्षा गायकवाड यांनी शाळांसंदर्भात महत्वपूर्ण माहिती दिलीये. येत्या 13 जूनपासून शाळा सुरु होणार आहे. शाळांसाठी एसओपी जारी करण्यात येईल, यासह शाळांमध्ये मास्क सक्ती करायची की नाही याचा निर्णय येत्या काही दिवसात जारी करण्यात येईल. दरम्यान कोरोना रुग्णसंख्येचा प्रभाव लक्षात घेता शिक्षण विभाग शाळांकरीता नवी कोविड नियमावली देखील देणार आहे.
गेल्या काही काळापासून कोरोनामुळे शाळा दीर्घ काळ बंद राहिल्याने विद्यार्थ्यांच मोठं शैक्षणिक नुकसान झालं. दरम्यान सध्या शाळा पुन्हा एकदा पूर्वपदावर सुरु झाल्यात. विद्यार्थ्यांचे नवे शैक्षणिक वर्ष सुरु होण्याकरीता अवघे काही दिवस राहीले आहेत. कोरोना रुग्णसंख्या देशभरात वाढत आहे. राज्यामध्ये कोरोनाचे रुग्णही सापडत आहेत. त्यामुळे राज्य सरकार शाळांसबंधीत कोणते निर्णय घेणार याकडे सर्व पालकांचे, विद्यार्थ्यांचे लक्ष लागून राहीलं आहे.