⭕️दिव्यात शिवराज्याभिषेकदिनी शिवरायांना अनोखी मानवंदना, आस्था आश्रमात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
शिवरायांना अनोखी मानवंदना,छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक उत्सव मंचतर्फे आस्था आश्रमात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
ठाणे,दिवा. ता 7 जून (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराज उत्सव मंच दिवातर्फे शिवरायांच्या राज्याभिषेक दिनानिमीत्त अनोखी मानवंदना देण्यात आली असून दिवा येथील आस्था आश्रमात भेट देवून गरजूंना ब्लँकेट,चहा,साखर,बिस्कीट तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे.छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेची सेवा केली.रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू दिला नाही.याच गोष्टीची तंतोतंत पालन करीत आज शिवप्रेमींनी शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा केला.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा 6 जून 1674 या दिवशी रायगडावर राज्याभिषेक झाला.या महापुरुषाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्वाचा दिवस म्हणजेच,शिवराज्याभिषेक दिन.हा दिवस स्वराज्याची सार्वभैमत्वाची,स्वातंत्राची प्रेरणा देणारी आहे.अशा दिनाचे महत्व आणखी दृढ होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज उत्सव मंच दिवा तर्फे गेल्या तीन वर्षापासून राज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात येतो.गेल्यावर्षी विविध हास्पीटल येथे जावून शिवप्रेमी मावळ्यांनी फळांचे वाटप केले होते.
या वर्षी मंचातर्फे सर्वधर्म समभावाने मोठ्या उत्साहात राज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.सर्वप्रथम दिवा मराठा दरबार येथे शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन फुलांचा वर्षाव करण्यात आला. पुजाही करण्यात आली.छत्रपती शिवाजी महाराज कि जय अश्या घोषणा देत मानवंदना देण्यात आली.यावेळी शिवप्रेमी श्री प्रविण उतेकर, शैलेश पवार ,रमेश शिंदे, अजित माने, योगेश राणे, योगेश कुलय, प्रीतम शिंदे ,निलेश पाटणे, दिलीप गोळे ,आदित्य कदम, दिलीप लटके, शशिकांत कदम,अविनाश कदम, संजय जाधव, नितीन पडागळे, अजित वाघमारे, योगेश भोसले, नितेश इंगोले, सुवर्णा कांबळे,महेश अवढन आदींसह अनेक मावळे उपस्थित होते.