दूरदर्शनचे जेष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं निधन
दूरदर्शनवरील बातम्यांचा बुलंद आवाज हरपला; जेष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं निधन
मुंबई – नमस्कार, आजच्या ठळक बातम्या, अशा भारदस्त आवाजात दूरदर्शनवरील बातमीपत्राची सुरुवात करणारे ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं आज निधन झालं. बातम्या सांगण्याची खास शैली आणि भारदस्त आवाज यामुळे ते दूरदर्शनवरील बातम्यांची ओळख बनले होते. प्रदीप भिडे यांच्यावर आज संध्याकाळी ६ वाजता अंधेरी पूर्व येथील पारशीवाडा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.