दिव्यात राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांचा भाजप मध्ये प्रवेश
दिव्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा भाजप मध्ये प्रवेश
ठाणे,दिवा ता 8 जून (प्रतिनिधी) :- दिव्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादी चे वार्ड अध्यक्ष विजय वाघ यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे व आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.
दिवा भाजपचे मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे ,ओबीसी अध्यक्ष रोशन भगत व इतर पदाधिकारी यांच्या पुढाकाराने हा प्रवेश सोहळा ठाणे येथे पार पडला.माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या प्रभागात भाजपने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते फोडल्याने हा सेनेला धक्का मानला जात आहे.भाजपचे रोशन भगत यांनी रमाकांत मढवी यांच्या प्रभागात जनहीताची कामे करण्यास सुरुवात केल्याने त्यांना या भागातून अनेक नागरिक भाजप मध्ये प्रवेश करण्यासाठी संपर्क करत आहेत असे रोहिदास मुंडे यांनी या प्रवेशावेळी सांगितले.यावेळी. जिल्हा संघटक सरचिटणीस विलास साठे जिल्हा उपाध्यक्ष नरेश पवार ठाणे शहर कार्यकारिणी सदस्य गणेश भगत दिवा मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे संघटक सरचिटणीस दिलीप भोईर ओबीसी मोर्चा अध्यक्ष रोशन भगत व्यापारी संघटना अध्यक्ष जयदीप भोईर राहुल साहू अवधराज राजभर गौरी शंकर पटवा आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
दिव्यातील जनता सत्ताधारी पक्षाच्या कामावर नाराज आहे.दिव्यात जी भीषण पाणी टंचाई आहे ती भाजपच दिव्यातील पाणी प्रश्न सोडवू शकते म्हणून एक पर्याय म्हणून अनेक नागरिक भाजप मध्ये प्रवेश करत आहेत असे भाजपचे रोहिदास मुंडे म्हणाले