धक्कादायक, नवरदेवासह दोघांचा दुर्दैवी मृत्यू
सोलापूर, ता 10 जून (ब्युरो रिपोर्ट) सोलापूरात देवासमोर लग्नाची पत्रिका ठेवण्यासाठी निघालेल्या नवरदेवासह दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. अक्कलकोट ते गंगापूर या रस्त्यावर बुधवारी रात्री 11 वाजता शक्करपीर दर्ग्याजवळ भीषण अपघात झाला. कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की तिघांचा जागीच मृत्यू झाला. दीपक बुचडे (29), आकाश ज्ञानेश्वर साखरे (28) आणि आशुतोष संतोष माने (23) (रा. हिंजवडी, पुणे) अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्यात अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 18 जून रोजी दीपकचे लग्न होणार होते. तुळजापूर, गंगापूर आणि अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी दीपक त्याच्या मित्रांसह अक्कलकोटहून गाणगापूरला निघाला होता. मात्र, मध्यरात्रीच्या सुमारास समोरून येणाऱ्या एका मालवाहू ट्रकने दीपक यांच्या कारला धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला. या अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला.