भांडुपमध्ये मॅरेथॉन बिल्डरच्या हलगर्जीपनामुळे 22 व्या मजल्यावरुन लाकडी बांबू कोसळले ?
भांडुप पश्चिम येथील क्रांती नगरातील मॅरेथॉनच्या बेशिस्त व हलगर्जीपणामुळे 22 व्या मजल्यावरुन लाकडी बांबू कोसळले?
लिंगेश्वर सोसायटीच्या नागरिकांचे जीव धोक्यात ?
मुंबई, ता 11 जून (किशोर गावडे)
शनिवार दिनांक 10 रोजी दुपारी 12.15 वाजता भांडुप पश्चिमेच्या क्रांती नगरातील मॅरेथॉन इमारतीवर 22 व्या मजल्या लावण्यात आलेले लाकडी बांबूंची परांदी अचानक कोसळल्याने लिंगेश्वर सोसायटीच्या आवारात बांबूचा मोठा खच पडलेला आहे. सोसायटीतील काही घरांवर लाकडी बांबू मोठ्या उंचीवरून कोसळल्यामुळे अनेकांचे पत्रे तुटले गेलल्याने रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र दुर्दैवाने कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही.तर येथील लगतच्या अनेक खोल्यांचे नुकसान झाले.तर दोघे गंभीर जखमी झाल्याचे वृत्त हाती आले आहे.
विभागातील नागरिकांनी या घटनेचा व विकास मॅरेथॉनचा जाहीर निषेध करून मॅराथॉनचा धिक्कार केला आहे. घटनेची माहिती कळताच प्रचंड प्रमाणात गर्दी वाढली आहे. भांडुप पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी उपस्थित झालेले आहेत ते घटनेचा तपास करीत आहे..भांडुप पोलिस संबंधित सिक्युरिटी, कॉन्ट्रॅक्टर्स ,सब कॉन्ट्रॅक्टर यांच्याशी चर्चा करून अधिक माहिती घेत आहेत. मॅरेथॉनचे कर्मचारी व कॉन्ट्रॅक्टर हे लिंगेश्वर सोसायटी मधील काही महिलांना धाकदपटशा दाखवत असल्याच्या तक्रारी देखील वाढू लागल्या आहेत.