दिव्याजवळील खर्डी गावात घरफोडी करून रोख रकमेसह लाखोंच्या दागिन्यांची चोरी.
दिव्याजवळील खर्डी गावात घरफोडी करून रोख रकमेसह 12 लाखांच्या दागिन्यांची चोरी.
ठाणे, दिवा. ता 11 जून (प्रतिनिधी ) :- दिव्याजवळील खर्डी गावात काल रात्री घरफोडी करून रोख रकमेसह 12 लाखांच्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना घडली आहे. श्री शत्रूघन बाळाराम गोंधळी यांच्या घरातील रोख रक्कम 4 हजार व लाखोंच्या दागिन्याची चोरी झाली असून शीळ-डायघर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी येऊन तपास सुरु केला आहे. घरमालक शत्रूघन बाळाराम गोंधळी हे रात्री भारत गियर कंपनीमध्ये रातपाळीला गेले होते तर त्यांच्या घरातील सर्वजण दातीवलीला आपल्या नातेवाईकांकडे गेले असता रात्री साधारण 1 ते पहाटेच्या आसपास घटना घडली असून अधिक तपास शीळ-डायघर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिक तपास करत आहेत.