मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मनसेकडून इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू !
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मनसेकडून इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू!
मुंबई, ता 13 जून ( किशोर गावडे )
मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका घोषित झालेल्या असताना तारीख व महिना निश्चित करण्यात आलेल्या नाहीत. मात्र,भांडुप विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या आठ वार्डात इच्छुक उमेदवारांची मनसेकडून चाचपणी सुरू झाल्याचे वृत्त हाती आले आहे.
रविवारी 12 जून रोजी सायंकाळी 7.30 वाजता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने लालाशेठ कंपाऊंड राजगड शाखा 117,भांडुप पश्चिम येथे मनविसेनेच्या वतीने विद्यार्थ्यांचे सदस्यत्व व मार्गदर्शन व व्यक्तीशा: भेटीसाठी मनसे नेते व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे उपस्थित होते.यावेळी, हजारोहून अधिक विद्यार्थ्यांनी आपले नावाचे फॉर्म भरण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती.यावेळी, भांडुप विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेचे सर्व पदाधिकारी पुरुष व महिला मोठ्या संख्येने अमित ठाकरे यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते.लालाशेठ कंपाऊंडमध्ये एक उत्साहाचे वातावरण दिसून आले. प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आपापल्या वार्डातील अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींना सदस्य मोहिमेत सामील करून घेतले. ठाकरे यांनी प्रत्येक सदस्याची माहिती घेऊन त्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.
या स्तुत्य उपक्रमाअंतर्गत बातमीचा कानोसा घेतला असता, या कार्यक्रमाला अमित ठाकरे व कॅरम स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याला सरचिटणीस रिटा गुप्ता यांची उपस्थिती, यामुळे भांडुप मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले होते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे लवकरच प्रत्येक विधानसभा निहाय बैठका घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. मनसेकडून इच्छुक असलेल्या उमेदवाराचे नाव ,प्रभाग क्रमांक, समाविष्ट भाग ,पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी किती ?जातीनिहाय आरक्षण कोणती आहेत. याची माहिती घेतली जाणार आहे .
2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेले नगरसेवक ,दुसऱ्या क्रमांकाची मते घेणारे उमेदवार ,त्यांचा पक्ष ,नवीन प्रभाग रचनेनुसार सद्यस्थित मनसे व अन्य पक्षाचे कोणकोणते उमेदवार सक्षम आहेत? याची चाचपणी सुरू झाल्याचे समोर आले आहे.
कोणकोणत्या प्रभागात कोणत्या संभाव्य उमेदवारांचे प्राबल्य आहे . कोणता उमेदवार जनतेशी थेट संपर्कात आहेत.
कोणत्या उमेदवाराने पक्षाच्या ध्येय धोरणानुसार प्रभागात काम केलेले आहे . कोणत्या उमेदवारांची जनमानसात त्यांची प्रतिमा चांगली आहे. पण उमेदवार मतदारांपर्यंत पोचला आहे का? याचेही ठोकताळे बांधले जाणार आहेत.
झोपडपट्ट्या, सोसायटीमधील मतदार संख्या लोकसंख्येनुसार महिला व पुरुष प्रमाण आधी माहिती मनसेकडे संकलित केली जात आहे .
मनसेकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी पक्षप्रमुख राज ठाकरे हे उमेदवारांना कोणते प्रश्न विचारतील? आणि आपण का इच्छुक आहात ? असे अनेक गंभीर प्रश्न विचारण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.असे विश्वसनीय सुत्रांकडून कळते