सात जन्म काय, सात सेकंदही नको बायको ; पत्नी पीडितांची पिंपळ पौर्णिमा !
औरंगाबाद, ता 13 जून (ब्युरो रिपोर्ट) आम्हाला सात जन्म काय, सात सेकंदही अशी बायको नको रे बाबा म्हणत, पत्नी पीडितांनी पिंपळाच्या झाडाला उलटे फेरे मारत पिंपळ पौर्णिमा साजरी केली. वट पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला औरंगाबादजवळील पत्नी पीडित आश्रमातील पत्नी पीडितांनी आज आज सकाळी आश्रमात ही पिंपळ पौर्णिमा साजरी केली. गेल्या ७-८ वर्षांपासून पत्नी पीडित आश्रमात पिंपळ पौर्णिमा साजरी करण्यात येते. हे मुंजा आम्हाला अशा भांडकुदळ बायका देऊन मरण यातना देण्यापेक्षा कायमस्वरूपी मुंजा ठेव, असं साकडं यावेळी पत्नी पीडितांनी पिंपळाच्या झाडाला घातलं एकतर्फी कायद्यामुळे पुरुष महिलांच्या गुलामगिरीच्या विळख्यात अडकला आहे. त्यासाठी आता पुरुष सबलीकरण करण्याची गरज आहे. भारतीय संविधानात अनुच्छेद १४ नुसार कायद्यासमोर समानता राहिली नाही. कायदा स्त्री व पुरुष असा भेदभाव करत आहे. अनुच्छेद २१ नुसार पुरुषांना देखील जगण्याचा अधिकार आहे. व्यक्ती स्वातंत्र्य आहे. पण आज ते एकतर्फी कायद्याने हिरावून घेतले आहे. बहुतांश पत्नी पीडित हे पत्नीच्या जाचाला कंटाळून व समाजात न्याय न मिळाल्याने हताश होऊन आत्महत्या करताना दिसत आहे. हे एन. सी.आर.बी. अहवालावरून हे स्पष्ट होते, असं पत्नी पीडितांनी म्हटले