पश्चिम महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषदेच्या विभागीय अध्यक्षपदी जुन्नरचे भाऊसाहेब महाराज हांडे.
पश्चिम महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषदेच्या विभागीय अध्यक्षपदी जुन्नरचे भाऊसाहेब महाराज हांडे. जुन्नर. पुणे , ता 14 जून (संतोष पडवळ) : जुन्नर तालुक्यातील पिपंळगाव जोगा गावचे लहानपणापासून वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेलं ह भ प भाऊसाहेब महाराज हांडे (वय 72) हे हांडे कुटूंबातील बीए शिक्षण झालेले सतत अनेक वर्षापासून किर्तन सेवेत त्यांच्या किर्तनाच्या सेवेबद्दल त्यांना पश्चिम महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषदेच्या विभागीय अध्यक्षपदी नियुक्ती देण्यात आली आहे. नुकतेच पुण्यातील टिळक रोडवरील दुर्वांकुर हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला असून प्रसंगी वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्राचे संस्थापक, अध्यक्ष ह भ प विठ्ठल पाटील (काकाजी) यांच्या हस्ते त्यांचे अभिनंदन व नियुक्ती पत्र देण्यात आले. सदर वारकरी साहित्य परिषदेचे पुणे जिल्हा अध्यक्षपद म्हणून अनेक वर्ष काम केले आहे. प्रसंगी सदर कामाची पोहच पावती व उत्कृष्ट काम पाहून वारकरी साहित्य परिषदने पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपद देण्यात आले आहे. पश्चिम महाराष्ट्र मध्ये सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा व पुणे या जिल्ह्यांचा समावेश आहे. (संपर्क 7498965151)