वटपौर्णिमेदिनी चोरट्यानी लांबविले महिलेचे १५ तोळे सोन्याचे दागिने
पनवेल, ता 15 जून (प्रतिनिधी) : वटपौर्णिमा दिनी सोन्याचे दागिने परिधान करून पूजेसाठी बाहेर पडलेल्या महिलांना सोने साखळी चोरांनी लक्ष्य केले. काल
खारघरमध्ये मंदा चंद्रकांत दळवी या पूजेसाठी घराबाहेर पडताच चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील १२ तोळे वजनाची गंठण, २ तोळे वजनाचे मंगळसूत्र आणि १ तोळे वजनाचा हार असे १५ तोळे सोन्याचे दागिने खेचून पलायन केल्याने महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मुर्बी गावातील मंदा चंद्रकांत दळवी वटपौर्णिमा निमित्त पूजेसाठी गावालगत असलेल्या वडाच्या झाडाच्या पूजेसाठी जात असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून पलायन केले. चोरट्यांनी मंगळसूत्र खेचून पलायन केल्याची माहिती खारघर पोलीस स्टेशन मध्ये मिळताच महिला पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली.