ठाण्यात एक्सेलसियर एज्युकेशन सोसायटी ग्रँड जॉब फेअर २०२२ उत्साहात .
ठाणे,ता 17 जून (प्रतिनिधी) : एक्सेलसियर एज्युकेशन सोसायटीच्या केसी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च (KCCEMSR), ठाणे यांनी 17 जून 2022 (शुक्रवार) रोजी कॉलेज कॅम्पसमध्ये जॉब फेअरचे आयोजन केले होते. KCCEMSR द्वारे क्वालिटी सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीज, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने मेगा जॉब फेअर २०२२ चे आयोजन करण्यात आले होते. KCCEMSR सामाजिक उत्तरदायित्व समजून घेते आणि स्वीकारते आणि म्हणून ते बाहेरील विद्यार्थ्यांसाठी सुद्धा खुले करण्यात आले जेणेकरून त्यांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घेतला.
चेअरपर्सन डॉ. हर्ष खन्ना म्हणाल्या , “सध्याची परिस्थिती खूप मागणीची आहे आणि आमच्या जवळपासच्या तरुणांना रोजगाराची संधी देण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलले आहे. आणि ऑनलाइन चाचणी आणि मुलाखती घेण्यास इच्छुक असलेल्या काही कंपन्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी हि बाब दिलासा देणारी होती, विशेषत: साथीच्या रोगानंतर, रोजगारातील अंतर भरून काढण्यासाठी आम्ही हा पुढाकार घेतला आहे.”
कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र TPO असोसिएशनचे सचिव डॉ. संजय जाधव यांच्या हस्ते झाले, यावेळी प्राचार्य डॉ. विलास नितनवरे, उपप्राचार्य डॉ. अरुंधती चक्रवर्ती, TPO प्रमुख डॉ. रवी प्रकाश, श्री. प्रताप नायर आणि डॉ. संपूर्ण मेहता आणि इतर प्राध्यापकांची प्रमुख उपस्थिती होती
व्यवस्थापकीय संचालक डॉ. साई किरण खन्ना आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पूजा राय यांच्या उत्स्फूर्त पाठिंब्याने आणि मार्गदर्शनामुळे कार्यक्रमात मोलाची भर पडली.
जॉब फेअर २०२२ मध्ये आयटी/सीएस पदवीधरांसाठी BE, B.Tech, BCA, BSc IT, MCA, आणि MSc IT क्षेत्रातील संधी उपलब्ध आहेत. जावा डेव्हलपर (Java Developer), पायथन डेव्हलपर (Python Developer) पीएचपी डेव्हलपर (PHP Developer), आयओएस डेव्हलपर (IOS Developer) आणि आणखी काही पदे ऑफर केली गेली. दुर्गम भागातील इच्छुकांपर्यंत पोहोचण्यासाठी काही रिक्रूटर्सनीही ते ऑनलाइन होस्ट केले. या जॉब फेअरला 15 हून अधिक कंपन्यांमधील जवळपास 2000 सहभागींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
KCCEMSR ही एक पंजाबी भाषिक अल्पसंख्याक संस्था आहे जी मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहे आणि AICTE व DTE मान्यता प्राप्त आहे आहे. संस्थेकडे NBA- आणि NAAC मान्यताप्राप्त अभ्यासक्रम आहेत. KCCEMSR चांगल्या प्लेसमेंटचा अभिमान बाळगते. संस्थेने राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर विविध मान्यवर पुरस्कार प्राप्त केले आहे. संस्थेच्या खालील शाखा आहेत
1. संगणक अभियांत्रिकी विभाग Computer Engineering
2. इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार विभाग Electronics and Telecommunication Engineering
3. माहिती तंत्रज्ञान विभाग Information Technology
4. व्यवस्थापन विभाग MMS/MBA
अधिक माहितीसाठी www.kccemsr.edu.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या