दिवा शिवसेना शहरातर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न.
ठाणे, दिवा (ता 20 जून, संतोष पडवळ ) : – दिवा शिवसेना शहरातर्फे येथीलच आकांक्षा सभागृहात विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.या सोहळ्यात दिवा शहरातील इयत्ता दहावी व बारावी उतीर्ण झालेल्या हजारो विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला.या सोहळ्यात दिवा शहरातून सिद्धार्थ जगदाळे ( 91.80 टक्के ) मार्क मिळवून प्रथम आला आहे.त्याच बरोबर पायल हसवे ( 91.60 टक्के),श्रावणी फाळके (91.40टक्के),सौंदर्य़ा कुंभार (91.40),रोहन शेडगे (90.40टक्के),सिद्देश सुर्यवंशी (91.40टक्के),नेहा पाटील (91.40 टक्के),अनिकेत गुप्ता (90.80 टक्के),साहील वाळुंज (91.60 टक्के),सायली चौथे (90.60 टक्के),जागृती इंगळे (91 टक्के),हर्ष पाटील (90 टक्के ) अश्या टाँप 10 विद्यार्थी 90 पेक्षा जास्त मार्कांनी दिवा शहरातून चमकले आहेत.या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात सर्व विद्यार्थांना शिवरायांची मुळ प्रतिमा आणि स्वस्तिक भेट म्हणून देण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिवा शहरप्रमुख श्री रमाकांत मढवी उपस्थित होते.तसेच कार्यक्रमात माजी नगरसेवक श्री शैलेश पाटील,मा.नगरसेवक श्री अमर पाटील, श्री उमेश भगत, दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष श्री आदेश भगत,मा.दिपाली भगत,मा.दर्शना म्हात्रे, मा.नगरसेविका सौ.अंकिता पाटील,श्री सचिन पाटील,श्री उमेश भगत,मा.नगरसेवक,श्री भालचंद्र भगत,श्री गुरु पाटील,मा.नगरसेवक दिपक जाधव,शिवसेना युवती प्रमुख साक्षी मढवी,सौ.अर्चना पाटील,श्री निलेश पाटील आदींसह दिव्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमात विद्यार्थांना मार्गदर्शन करताना माजी उपमहापौर रमाकांत मढवी म्हणाले की, जसा शेतकरी पावसाची वाट पहात असतो तसंच मुलं आपल्या रिझल्टची वाट पहात असतो.या रिझल्टमुले मुलांना सुखद आनंद मिळतो. आज जे विद्यार्थी गुणवंत,यशवंत झालेले आहेत अश्या विद्यार्थी व पालकांचा सन्मान करणं हे शिवसेनेचे कर्तव्य आहे. गेली 30 वर्षे शिवसेना शैक्षणिक क्षेत्रात काम करीत आहे.स्वस्त दरात वह्या वाटप करणे,दहावीच्या मुलांना सराव परिक्षा आयोजित करणे,मुलांना करिअर गाईडन्स,युपीएसी,एमपीएससी क्लास लावणे असतील,मार्गदर्शन शिबीरे असे उपक्रम अऩेक वर्षापासून शिवसेना राबवित आहे.
मुलांनी करियरकडे बघताना मित्राने एखाद्या काँलेजला अँडमिशन घेतलेय म्हणून, त्या जागेवर मलाही अँडमिशन भेटले पाहीजे तसे न पाहता,माझ्या भविष्यासाठी मला जे यशस्वी करणारे क्षेत्र आहे, ज्याच्यातून मला रोजगार,व्यवसाय करु शकतो अशी क्षेत्रे विद्यार्थांनी निवडली पाहीजेत असे म्हणाले.
*शैक्षणिक संस्थांनी मागील कोविड परिस्थितीचे गांभीर्य बाळगावे – श्री मढवी*
मागील तीन वर्षे कोरोना काळात पालक भरडले गेले आहेत.त्यामुळे त्या काही काळात विद्यार्थांना फी भरण्याचा प्रश्नही उद्धभवणार आहेत.त्यामुळे सर्व शैक्षणिक संस्थांनी कोविडच्या काळात असलेली परिस्थिती पाहून गांभीर्याने राहिले पाहीजे. दिव्यात राहणारी सर्वसामान्य जनता आहे.त्यामुळे शाळांनी विचार केला पाहीजे. मला स्वारस्य हे या दिवेकर जनतेला अडचणी निर्माण होता काम नयेत यात आहे.मुलांचे करिअर सुसह्य राहीले पाहीजे यात आहे. दिव्यातील कोणत्याही अँडमिशनच्या समस्या आल्यास त्या शिवसेनेने सोडविल्या आहेत.परंतु निवडणुका आल्या म्हणून प्रसिद्ध माध्यमांद्वारे समोर घेवून जाणे अशी शिवसेना नाही असे बोलताना श्री मढवी म्हणाले.
– 23 जून रोजी करिअर मार्गदर्शन शिबीर-
मुलांना योग्य दिशा मिळावी म्हणून येत्या 23 तारखेला शिवसेना दिवा शहराच्या युवती सेनेच्यावतीने करिअर गाईडन्सचा शिबीर आयोजित केलेला आहे.त्यातून विद्यार्थांना योग्य क्षेत्र कशी निवडता येईल याचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या मार्गदर्शन शिबीराचा सर्व विद्यार्थांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.